
प्रतिनिधी: प्रवीण जोशी…
ढाणकी
उमरखेड तालुक्यातील कोर्टा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या बंदी भागातील निंगनूर येथे गेल्या कित्येक वर्षांपासून बंगाली डॉक्टरांचा बाजार तेजीत असल्याचे दिसून येत आहे कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय शिक्षण घेतले आहे किंवा कोणत्याही प्रकारची वैद्यकीय परवानगी नसतांना आदिवासी बहुल भागातील भोळ्या भाबड्या जनतेवर उपचार करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तसेच एखाद्या वेळेस शस्त्रक्रिया करण्यात हातखंड असलेले डॉक्टर अवघड आणि किचकट शस्त्रक्रिया असेल तर आपल्यापेक्षा अनुभवी आणि उच्चविद्याविभूषित असलेल्या डॉक्टर कडे रुग्णांना पाठवतो पण बंगाली डॉक्टर भगंदर आणि मुळव्याध सारख्या दुर्धर आजार असलेल्या शस्त्रक्रिया करून रुग्णांना जीवाशी , व भावनिक खेळ करत करण्याचा प्रयत्न करत आहेत. होमिओपॅथी, ऍलोपॅथी यांची सुद्धा रुग्णांना यांच्याकडून ट्रीटमेंट मिळते हे विशेष. ज्या ठिकाणी शासकीय यंत्रणा पोहोचायला उशीर लागेल व अत्यंत गोरगरीब जनता व जंगल भाग परिसरात या डॉक्टरांनी आपले ठाण मांडले आहे व शासकीय यंत्रणा पोहोचलीच तर आपले दुकान उचलून दुसऱ्या गावी जाण्याचा तयारीत असतात. स्वयंघोषित नेत्यांना व काही नागरीकांना हाताखाली घेऊन हे डॉक्टर आपला धंदा चालवत असल्याचे परीसरात खंमग चर्चा रंगतांना दिसून येत आहे. नींगनुर हे गाव उमरखेड तालुक्यातील शेवटच्या टोकावर असल्याने आरोग्य अधिकारी यांचे या बंगाली डॉक्टर कडे दुर्लक्ष होत आहे का? असा प्रश्न परीसरातील नागरिक करीत आहे. बंगाली डॉक्टर वर कारवाई झाली असे गेल्या कित्येक दिवसापासून ऐकिवात नाही आणि कारवाई झाली तरी ती थातूरमातूर स्वरूपाची होते. बंगाली डॉक्टरावर आरोग्य विभाग पोलीस प्रशासनाकडून थातूर मातूर कारवाई करून सोडून देण्यात आल्याने बंगाली डॉक्टर चांगलेच फोफावल्या चे दिसून येत आता जिल्हा आरोग्य अधिकारी या बंगाली डॉक्टर कडे लक्ष देतील का? हे पाहणे गरजेचे आहे.
