
फुलसावंगी प्रतिनिधी /संजय जाधव
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा कडुन घेण्यात आलेल्या परिक्षेच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना सोमवारी १ वाजता ऑन लाईन निकाल जाहीर झाला आणि यामध्ये फुलसावंगीच्या जिल्हा परिषद हायस्कूल चा निकाल ९७.३४ येवढा लागला. या वर्षी शाळेतील ९ विद्यार्थी हे ९० टक्क्याच्या वर गुण घेण्यात यशस्वी झाले. वैभवी माधव घोडे ९३.२०, विद्या सिद्धार्थ रणवीर ९१.८० अमिषा विवेक पांढरे ९१.४०, ऋतुजा ग्यानबा सुरोशे ९१.२०, अनामिका आनंदा चव्हाण ९१.२०, राधिका बाळु सुर्यवंशी ९१.००, तुषार मुकेश सुर्वे ९०.८०, पुनम पंडित राठोड ९०.६०, अंजली दिलीपसिंग राजपुत ९०.२० या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. त्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक दयानंद हातमोडे यांनी प्रेमचंद अंधारे, बाळासाहेब मुलगीर, गणपत पडलवार, स्वप्नील सावळे, शिवमाला सोनटक्के, हनवते मॅडम, नामदेव राठोड, विकास माने, राजु काटोले, रामेश्वर राऊत, संदिप खोकले, गहुकार सर, गजानन व्हडगीरे, दुर्वास भारती, अनिल कोरेवाड, सुमेरा बी खान मॅडम, अर्चना लकडे, स्वाती आखरे,व गायत्री कापसे यांनी सुध्दा विद्यार्थ्यांनचे कौतुक केले.
