
प्रतिनिधी,प्रवीण जोशी.
ढाणकी..
ढाणकी पासून जवळच असलेल्या गांजेगाव शिवारामध्ये ऊसाला पाणी देत असताना रानडुकराच्या कळपाने हल्ला केला त्यात शेतकरी गंभीर जखमी झाला. असून पायाला हाताला कडकडून चावा घेत डुकरांनी हल्ला चढवला. शेजारील शेतामध्ये असलेल्या महिला व उपस्थिती असलेल्या मजुर बांधवांनी आरडा ओरड करताच रानडुकराचा कळप निघून गेला. दिनांक 07 जानेवारीला दुपारी एक वाजता शेतामध्ये पिकाला पाणी देत असताना. शेत बांधावर लगत असलेल्या उसातून रानडुकराचा कळप अचानक बाहेर येऊन 70 वर्षीय शेतकरी दत्ता घमाजी कवाने यांच्या पायाला व हाताला कडकडून चावा घेतला. व गंभीर जखमी केले. बेशुद्ध अवस्थेत शेतकरी दत्ता कवाने बांधावर पडून राहिले आरडा ओरड झाल्याने परिसरातील शेतकरी धावत आले. व त्यांनी ढाणकी प्राथमिक आरोग्य केंद्रात उच्चारासाठी दाखल केले असता खोलवर जखम झाल्याच्या कारणांनी व डुक्कर चावल्याची इंजेक्शन असल्याकारणाने त्यांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
गांजेगाव ढाणकी परिसरात वन्य प्राण्यांनी मोठा हैदोस घातला असून शेतकऱ्याचे मोठे नुकसान वन्यजीव प्राणी करत असून हिंसक प्राणी सुद्धा शेतकऱ्यावर हल्ला केल्याच्या अनेक घटना परिसरात घडल्या तरी पण वनविभागा चे अधिकारी व कर्मचारी याबाबतीत गांभीर्याने नसून अनेक तक्रारी वनजीव विभागाकडे दाखल होऊनही दखल गांभीर्याने घेतल्या जात नाही. शेतकऱ्याचा ऊस हरभरा भुईमूग यासारख्या पिकाला रानडुक्कर फस्त करीत असून रानडुक्कर नीलगाय व कोल्यापासून शेती पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकऱ्यांनी दाद मागायची तरी कुठे हा मात्र यक्ष प्रश्न होऊन बसला आहे.
