शेतातील सुसज्ज मंदिरातील श्री भगवान हनुमानजी च्या मुर्ती ची विटंबना करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करावी:राळेगाव शहर कॉग्रेस कमेटी च्या वतीने निवेदन

1

           

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

शेतामधील सुसज्ज मंदिरातील हनुमान मुर्ती ची विटंबना करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करावी,अशा आशयाचे निवेदन राळेगांव शहर काँग्रेस अध्यक्ष प्रदीपभाऊ ठूणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यानी तहसिलदार राळेगांव यांना दिलं आहे.
 

मौजा बरडगाव शिवारातील श्री भिवा पुडके यांच्या शेत गट क्र १७०/१ मध्ये भगवान श्री हनुमानजी चे मंदिर सुसज्ज स्थितीत गेल्या अनेक वर्षे पासून असून दर वर्षी परिसरातील अनेक शेतकरी, भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात, हनुमान जयंती उत्सव या ठिकाणी मोठया प्रमाणात साजरा करण्यात येतो.
    परंतु दि ११/०८/२०२१ रोजी शेतकरी श्री शशिकांतजी लढी सकाळी सकाळी दर्शन करण्या करता मंदिरात गेले असता, मंदिराचे कुलूप तोडून मंदिरात असलेल्या लाकडी गदा द्वारे मंदिरातील भगवान श्री हनुमान जी च्या मूर्ती तोडफोड करून मूर्ती ची विटंबना केल्याचे आढळून आले, या घृणास्पद प्रकाराची माहिती राळेगाव पोलीस ठाण्यात तेथे शेती करीत असलेल्या  भारत ठुणे व  शशिकांत लढी यांनी राळेगाव पोलीस ठाण्यात दिली, परंतु या बाबतीत संबंधित अधिकारी यांनी कुठल्याही प्रकारची चौकशी केली नाही. 
   भारत देशात विविध धर्माचे लोक राहतात    प्रत्येक धर्माच्या लोकांना आपल्या देव देवतांची पूजा अर्चा करण्याची मुभा आहे, तर मग मंदिर शेतातील आहे त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी आमची नाही असे म्हणून राळेगाव पोलीस निरीक्षक आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत असेल तर हा प्रकार गुन्हेगाराला पाठीशी पाठीशी घालण्याचा प्रकार म्हणावा लागेल, आम्ही राळेगाव शहर कॉग्रेस पदाधिकारी व परिसरातील नागरिक