
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील सराटी बोराटी लोणी बंदर खैरगाव सखी वरध ही गावे जरी राळेगाव तालुक्यात येत असली तरी यांना शेतीसाठी व घरगुती मिळणारा विजपुरवठा हा पांढरकवडा अंतर्गत मोहदा येथील सबस्टेशन मधून मिळत असून या गावांसाठी 250 मेगावॉटचे ट्रान्सफॉर्मर बसविले असून आता या वेळी सर्वच शेतकरी ओलीताचे साधन म्हणून मोटरपंपासाठी विजेचा वापर करत असल्याने ही विज शेतकऱ्यांना अपूरी पडत आहे.अशातच या परिसरातील लोकांनी मोहदा सबस्टेशन गाठून 500 मेगावॅटचे ट्रान्सफॉर्मर बसवून देण्याची मागणी केली, अर्ज सुद्धा सादर केले परंतु संबंधित विभाग शेतकऱ्यांना टोलवाटोलवीची उत्तरे देत आहे. शेतकऱ्यांनी पंप सुरू केले की लवकरच काहीतरी प्राब्लम तयार होऊन लाईन बंद पडते अशातच पंपासोबतच घरगुती विज सुद्धा गायब होते. ही गावे जंगलाला लागून असून या भागात मागील काही वर्षांपूर्वी अवनी वाघीनने धुमाकूळ घातला आणि त्यात अनेक शेतकरी शेतमजूरांना आपला जीव गमावा लागला.अशातच या वाघीनचा जरी बंदोबस्त शासनाने केला असला तरी आताही जंगलाच्या दिशेने,रस्त्याने , शेतीच्या सभोवताली वाघाचा मुक्त संचार दिसून येत आहे.अशातच लाईन जर व्यवस्थित सुरू असली तर प्रकाशाच्या आधाराने शेतकरी शेतात, किंवा बाहेर निघण्याची हिंमत करतात.अशातच हा लाईनचा प्राब्लम सुरू झाल्याने मात्र शेतकरी धास्तावला असून अनेकदा संबंधित विभागाला चकरा मारून सुद्धा या विभागाचे अधिकारी या समस्येकडे लक्ष द्यायला तयार नाही याचा अर्थ हे सरकार खरेच शेतकरी विरोधी आहे का, किंवा या अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधीचा धाक नाही का, या मतदारसंघांचे विद्यमान आमदार हे आदिवासी विकास मंत्री असून सुद्धा साध्या साध्या समस्या सोडवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रयत्न करावा लागत असल्याने शेतकरी त्रस्त झाले असून या शेतकऱ्यांनी यवतमाळ जिल्हा पालकमंत्री मा.संजय राठोड यांना याबाबत निवेदन पाठविणार असून या निवेदनाच्या प्रती आदिवासी विकास मंत्री ना.प्राचार्य अशोक उईके अधिक्षक अभियंता यवतमाळ कार्यकारी अभियंता पांढरकवडा, सहायक अभियंता घाटंजी, कनिष्ठ अभियंता मोहदा यांना पाठविल्या असून यावर ताबडतोब विचार न झाल्यास आमरण उपोषणाचा व येणाऱ्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे या अर्जाद्वारे कळविले आहे.
