शिवाजी गार्डन राळेगाव येथे गोंडवाना गणतंत्र पार्टी ची तालुका आढावा बैठक संपन्न

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर


सामान्य लोकांसाठी सातत्याने प्रयत्न करत असलेली गोंडवाना गणतंत्र पार्टी गावा गावात जाऊन सामाजिक आणि राजकीय मार्गदर्शन करत आहे.समाजातिल दुर्बल घटक, कष्टकरी शेतकरी, शेतमजूर,वाढती बेरोजगारी , सरकारी योजना पासून वंचित असलेल्या समाजातील लोकांवर होणारा अन्याय दुर व्हावा यासाठी राजकीय पक्ष आढावा बैठक आयोजित करतात हाच उद्देश घेऊन गोंडवाना गणतंत्र पार्टी ची तालुका आढावा बैठक शिवाजी उद्यान राळेगाव येथे आज आयोजित केली होती. -. – या आढावा बैठकीत प्रमुख उपस्थितीत मा बळवंतराव मडावी प्रदेश कार्याध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी हे अध्यक्ष होते तर आढावा बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा मधुसूदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच हे उपस्थित होते.मा विठ्ठलराव धुर्वे जिल्हा अध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी मा विजया रोहणकर जिल्हा अध्यक्ष ( महिला ) मा ज्ञानेश्वर कुमरे जिल्हा कार्याध्यक्ष मा राजेंद्र येडमे जिल्हा उपाध्यक्ष मा हर्षल आडे जिल्हा संघटक मा ताराबाई कोटनाके जिल्हा उपाध्यक्ष मा निरंजन वासरीकर जिल्हा संघटक मा जयश्री मेश्राम जिल्हा सचिव मा गजानन कुमरे पांढरकवडा मा हणुमान टेकाम तालुका अध्यक्ष कळंब मा कलावती ऊईके कळंब तालुका संघटक मा विनोद पराते तालुका संघटक राळेगाव उपस्थित होते -. – तालुका आढावा बैठकीचे आयोजन मा वर्षा आडे तालुका अध्यक्ष राळेगाव गोंडवाना गणतंत्र पार्टी यांनी केले होते आणि संपूर्ण तालुक्यातिल गावं तिथं बुथ निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले आणि नवीन युवा तरुण युवक/ महिलांना नियुक्ती करुन सामाजिक संघटना आणि सामान्य लोकांसाठी राजकारण कसे महत्वाचे आहे हे लक्षात आणून दिले. -. – आढावा बैठकीचे प्रास्ताविक मा संतोष आडे यांनी सांगितले आढावा बैठकीत प्रमुख मार्गदर्शक यांच्या नेतृत्वाखाली येत्या महिन्यात “‘ गावं गावं झेंडा – गोंडवाना का अजेंडा “‘अभियान सुरू करणार अशी भूमिका आढावा बैठकीत घेण्यात आली आहे.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ वर्षा आडे तालुका अध्यक्ष राळेगाव यांनी केले या बैठकीत राहुल वाढवे,समिर कुमरे,उमेश उईके गजानन वडदे, प्रविण खैरे, सोनटक्के काका, नितीन ठाकरे, सोनाली तलांडे, अर्चना मरस्कोले , मंगला टेकाम, गजानन वड्डे कविता अनाके मनिषा पुसनाके, गजानन कुमरे प्रतिक मरापे शोभा येडमे, मंगला मडावी नर्मदा वाढेकर, लता मडावी, वंदना तोडासे ,अणपुर्णा तोडासे, कौसल्या पंधरे मैनाबाई परचाके आणि गोंडवाना गणतंत्र पार्टी च्या अनेक सदस्यांचा समावेश आढावा बैठकीत दिसून येत होता सर्व सदस्य नवनियुक्त पदाधिकारी, जेष्ठ मार्गदर्शक यांचे आभार मा हर्षल आडे जिल्हा संघटक यवतमाळ यांनी मानले