गांधीजींच्या देशात उपोषण कर्त्यांच्याकडे दुर्लक्ष लोकप्रतिनिधीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

राळेगाव नगर पंचायत येथील सफाई कामगार यांचे सुरू असलेल्या आंदोलन आज रोजी 21वा दिवस होऊन कोणताही अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही, याचाच अर्थ असा की त्यांच्या रास्त मागण्या नसेल तर त्यांची उपोषण अवास्तव आहे असा घोषित करा लोकप्रतिनिधींनी किंवा जर वास्तव्य असेल तर त्यांचं व्यवस्थित संगोपन करण्याची जबाबदारी हे लोकप्रतिनिधी आहे,गांधी गिरी उपोषण सुरू असताना प्रशासन निद्रा व्यवस्थेत दिसून येत आहे, यवतमाळ जिल्हा आणि वर्धा जिल्हा लागून असल्याने गांधीगिरी जिल्हा म्हणून ओळखल्या गेलेला वर्धा जिल्हा तसेच यवतमाळ जिल्हा आणि गांधीजीचा सहकारी असलेला आंदोलन म्हणजेच उपोषण परंतु साखळी उपोषण सुरू असताना यांच्याकडे प्रशासनाची व लोकप्रतिनिधीचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष दिसल्या असल्याचे दिसून येत आहे , आज रोजी 21 दिवस पूर्ण होऊन कोणत्याही प्रकारे कोणतेही कर्मचारी किंवा अधिकारी त्यांच्याकडे पाहण्यास दिसत नाही याचेच कारण असे समाजात दिसून येते की विशिष्ट समाज असल्याने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे याची प्रचिती म्हणजे 21 दिवस होऊन असलेले उपोषण हे खरंच जाणीवपूर्वक समाज हित न जोपासता विशिष्ट समाजाचे हित जोपासताना दिसून येत आहे, असे जनतेतून सूर येत आहे, आणि मातंग समाज हा खरंच देशाचा आदर्श कणा असून त्यांच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यांच्या मागणी पूर्ण कराव्यात त्यांच्या जर वास्तव मागण्या आहेत त्या प्रशासनाने जरूर सोडवाव्या व ज्या अवास्तव मागण्या आहे, त्या प्रशासनाकडे पाठवाव्या असे गांभीर्याने चर्चा मातंग समाज व जनतेतून राळेगाव कर जनतेतून होत आहे.