तालुकास्तरीय क्रीडा सामन्यात जि. प. उ. प्रा. शाळा पिपळापूर येथील विद्यार्थ्यांनी विविध खेळात व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

खेळ व क्रीडा संवर्धन पं. समिती राळेगाव अंतर्गत लखाजी महाराज झाडगाव येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय क्रीडा सामन्यात जि. प. उ. प्रा. शाळा पिपळापूर येथील विद्यार्थ्यांनी विविध खेळात व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
या स्पर्धेमध्ये प्रकम ‘क’मध्ये रोहित दिपक शेंडे याने कॅरम मध्ये तसेच प्रकम ‘ब’ मध्ये कु. दिव्या सोमेश्वर कुडमते हिने लांब उडी मध्ये प्रथम क्रमांक पटकावला.
सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री. पवार सर. कु. मेश्राम मॅडम, श्री. नाहाते सर, श्री. कांबळे सर,श्री. बोरडे सर तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य तसेच सर्व ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.