
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर येथील स्व. मानसिंग वडते यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या परिवारातील सदस्यांनी काही तरी वेगळा उपक्रम राबविण्याचा संकल्प निश्चित केला. आणि वरूड जहांगीर येथील जिल्हा परिषद शाळेत नियमितपणे, प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या,आपला जीव ओतून विद्यार्थ्यांना शिक्षण देणारे शिक्षक श्याम ढुमणे सर, अविनाश ठाकरे सर, सुरेश तोडासे सर,प्रविण थुल सर, गजानन वरघडे सर आणि कु.पोकळे मॅडम यांना वडते परिवाराकडून शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.सोबतच शाळेतील जवळपास एकशे पन्नास विद्यार्थ्यांना बुक,पेन आणि खाऊ वाटप करण्यात आला.हा उपक्रम इतरत्र खर्ची घालण्यापेक्षा आपल्या गावातील शिक्षकांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी वडते परिवारांनी हा उपक्रम राबविला आहे.त्यावेळी या कार्यक्रमाला गावातील माजी शालेय व्यवस्थापन समिती सभापती किरण निमट, सदस्य गजानन सोनटक्के, माजी ग्रामपंचायत सदस्य पुणेश्वर उईके, माजी सरपंच शंकर मेश्राम, भजन स्पर्धेचे आयोजक उत्तम भोरे, खरेदी विक्री संघाचे माजी उपाध्यक्ष शेषराव भोरे, प्रतिष्ठित सदानंद भोरे,त्याच प्रमाणे वडते परिवारातील सुनबाई गीता वडते, जयसिंग वडते,मोतिसिंग वडते, सौरभ वडते,राहूल वडते,सर्वेशकुमार राठोड राळेगावकर तथा इतर गावांतील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.या उपक्रमामुळे एक चांगला पायंडा पडला असल्याची प्रतिक्रिया शाळेच्या वतीने देण्यात आली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेषराव भोरे यांनी केले तर आभार गजानन वरघडे सर यांनी मानले.
