
प्रतिनिधी:: प्रवीण जोशी
ढाणकी
ढाणकी शहरांमध्ये शिवजयंती निमित्त स्थानिक जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात दिनांक २५/२/ २०२३ रोजी कांचनताई शेळके यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता कीर्तनाच्या तत्पूर्वी संस्कार मूर्ती असणाऱ्या जिजामातेला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले यावेळी मोकळ्या जागेतील सभागृह श्रोत्यांनी प्रचंड भरला होता अनेक लहान मुली व महिला या किर्तनरुपी सेवेला उपस्थित होत्या विशेष म्हणजे कीर्तनकार कांचन ताई यांनी आयोजन करणाऱ्या सर्व शिवभक्तांचे भरभरून कौतुक केले व शिस्तबद्ध नियोजनाच्या कार्यक्रमाचे व आयोजकांचे मोल पैशातून करण्यासारखेच नसते असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले व त्यांनी सर्व आयोजकांचे नम्रपणे आभार मानले तसेच एवढ्या लहान वयात ताईनचा व्यासपीठावरील सभादीटपणा वाखाण्या जोगा होता
आपुलिया हिता जो असे जागता |धन्य माता पिता तयाचिया|| कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक| तयाचा हरिक वाटे देवा|| गीता भागवत करिती श्रवण| अखंड चिंतन विठोबाचे || तुका म्हणे मज घडो त्याची सेवा| तरी माझा दैवा पार नाही||.
प्रस्तुत प्रस्तावनेला अनुसरून सेवेला घेतलेला अभंग यावर बोलताना कांचनताई म्हणाल्या समाज सुज्ञ सुजाण बनवायचा असेल तर सर्व काही आई वडिलांच्या संस्कारावर अवलंबून असते आणि हे बिंबवायचे असल्यास उत्तम विद्यापीठ आई वडील असतात. एखाद्या व्यक्तीने किंवा मुलीने मुलाने उत्कृष्ट कामगिरी केल्यास लगेच त्याच्या आई वडिलांचे नाव आणि हुंकार समाज मनात बिंबवल्या जातो त्यामुळे आपल्याला संतती घडवायची असेल किंवा पिढी घडवायची असेल तर संस्कार जरुरी आहे तसेच उत्कृष्ट व बलाढ्य पिढी घडवायची असल्यास आई-वडिलांसारखे विद्यापीठ जगात शोधून सुद्धा सापडणार नाही महाराष्ट्र ही भूमी खूप भाग्यवान आहे की जिथे अनेक संतांची मांदियाळी लाभली की जिथे संत मुक्ताबाई संत कान्होपात्रा माता जिजाऊ सारख्या स्त्रीशक्ती लाभल्या कारण उत्तमोऊत्तम शिक्षण देऊन आईच वडील आपल्या पाल्याला घडू शकते म्हणून आई-वडील जगातले सर्वश्रेष्ठ चालते बोलते संस्कार मंदिर होय तत्कालीन काळात परकीय लुटारूंनी आक्रमणे करून साधुसंतावर व स्त्रियांवर अत्याचार करून समाज फार गल्लीतगात्र झाला असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजाला जीवन जगण्याचा मार्ग दाखवला अन्याय अत्याचार व गुलामीला झुगारून एक उत्कृष्ट राज्य बनविले जेणेकरून येणाऱ्या अनेक काळात ते ध्यानात राहील शिवाजी महाराज जे घडले ते माता जिजाऊंच्या संस्कारामुळेच म्हणूनच मातापित्याला भविष्यातील व समाजाचे हीत साधावयाचे असल्यास योग्य संस्कार करणे जरुरी आहे सद्यस्थितीचा विचार केला असता तरुण मुले हे व्यसनाधीन तेकडे वळत आहेत व लहान मुले मोबाईलच्या विळख्यात सापडत असून त्यांच्यावर सुद्धा संस्कार बिंबवणे गरजेचे आहे त्यामुळे तरुण पिढीला आणि लहान बालकाला नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या व माता जिजाऊंच्या संस्काराची गरज आहे असे प्रतिपादन यावेळी ह भ प कांचन ताई यांनी केले
