
.
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
सोनामाता हायस्कूल चहांद वर्ग नववी कडून दहावी च्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक अनिल धोबे सर तसेच प्रमुख अतिथी घोडे सर,चिव्हाने सर, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमात वर्ग दहावी तील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच सर्व शिक्षकांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विविध मुद्यांवर चर्चा केली व परिक्षेच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कांबळे सर यांनी केले तर आभार शिवनकर सर यांनी केले.या कार्यक्रमात सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
