महिला कुस्तीपटूंनी गाजवला हिमायतनगर येथील यात्रेचा फड


कुस्त्या पाहण्यासाठी हजारो कुस्तीपटूंची उपस्थिती…

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी/- प्रशांत राहुलवाड

कोरोनाच्या महामारीमुळे जवळजवळ दोन वर्षांपासून हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिर देवस्थान कमिटीची यात्रा -जत्रा बंद होती परिणामी येथील प्रसिद्ध कुस्त्यांची दंगल व लाखो रुपयांच्या बक्षिसांची लयलूट सुद्धा कोरोनाने थांबली होती त्यामुळे यावर्षी होत असलेल्या भव्य कुस्त्यांच्या दंगलीमध्ये जालना येथील महिला कुस्तीपटूची कुस्ती गाजल्याने उपस्थित प्रेक्षकांचे मने जिंकली असल्याचे पाहायला मिळाले.

हिमायतनगर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे येथील जागरूक देवस्थान असलेल्या श्री परमेश्वर मंदिर देवस्थान कमिटी कडून दरवर्षी लाखो रुपयांच्या बक्षिसांची लय लुट करण्यासाठी भव्य यात्रा महोत्सव भरवला जातो तो पाहण्यासाठी आंध्रप्रदेश तेलंगणा व विदर्भातून हजारों यात्रे करू मोठ्या संख्येने हिमायतनगर शहरात दाखल होतात त्यातच येथील नावाजलेल्या कुस्त्यांचा फड पाहण्यासाठी दूर दुर वरून अनेक पैलवान या कुस्त्यांमध्ये सहभागी होत असतात अनेक पैलवानांना ह्या कुस्त्यांच्या दंगलीची प्रतीक्षा लागली असते त्यामुळे ह्या यात्रा महोत्सवातील भव्य कुस्त्यांचे दंगलीचां शुभारंभ आज दिनांक 4 मार्च रोजी शहरातील श्री परमेश्वर मंदिर देवस्थान कमिटीचे संचालक व शहराचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड सह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत या कुस्त्यांच्या दंगलीचे उद्घाटन करण्यात आले सुरुवातीला बालगोपालांच्या कुस्त्यांनी या कुसती फडाची सुरुवात करण्याची परंपरा मागील अनेक दिवसापासून सुरू आहे त्यानंतर जालना येथील महिला कुस्तीपटू ने येथील कुस्तीचे मैदान चांगलेच गाजवल्याने उपस्थित प्रेक्षकांनी ही कुस्ती पाहण्यासाठी चागलीच गर्दी केली होती त्या कुस्तीने अनेक प्रेक्षकांची मने जिंकली असल्याचे पाहायला मिळाले त्याचबरोबर अनेक दिग्गज मातब्बर पैलवानांच्या कुस्त्या सुद्धा या यात्रा महोत्सवां मध्ये गाजल्या वाशिम शेवटची मानाची कुस्ती रात्री उशिरापर्यंत चालल्याने ही कुस्ती पाहण्यासाठी सुद्धा अनेक प्रेक्षकांची उपस्थिती तशीच पाहायला मिळाली.