मार्कंडेय पोदार लर्न स्कूल मध्ये क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

मार्कंडेय पोदार लर्न स्कूल मध्ये क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली. प्रसंगी विद्येची देवता माता सरस्वती यांचे फोटोला हार अर्पण करून,उपस्थित पाहुणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले,21,डिसेंबर रोजी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन ,
संस्था अध्यक्ष मान श्री रमेशजी व्हि, सुंकुरवार यांचे हस्ते करण्यात आले. प्रमूख पाहुणे म्हणून संस्था सचिव मान श्री राहुल आर. सुंकुरवार, मान, प्राचीताई आर सुंकुरवार, आदी उपस्थित होते. विद्यार्थी यांनी मशाल हातात घेऊन दौड केली आणि हवेत बलून सोडून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन झाले असे जाहीर केले.
मुख्याध्यापक मान, मो. अमिन मो, नुरानी यांनी क्रीडा प्रतिज्ञा विध्यार्थी सर्व शिक्षक वृंद यांच्या समोर दिली. नंतर विध्यार्थी यांची दौड स्पर्धा,कबड्डी, ब्येटमिंटन, बास्केट बॉल, संगीत खुर्ची, इत्यादी खेळ घेण्यात आले, दुसऱ्या दिवशी 22 डिसेंबर रोजी क्रिकेट, लेमन स्पून, रस्सी खेच, त्याच बरोबर आंतर खेळ, क्यारम, बुद्धिबळ, खेळ घेण्यात आले, मुला मुलींचा उत्स्फूर्तपणे सहभाग होता, आणि तिसरा दिवस 23डिसेंबर, विध्यार्थी यांचे माता पालक उपस्थित होते, त्यांनी सुद्धा आपल्या नावाचे विविध स्पर्धेत नाव नोंदणी केली त्यात संगीत खुर्ची, 70मीटर दौड, रस्सी खेच, बलून रेस, खेळ स्पर्धा घेण्यात आली,
अखेर क्रीडा स्पर्धा उत्सवाची सांगता पारितोषिक वितरण समारंभ यांनी करण्यात आली, मंचावर उपस्थित मान, श्री अभय धोबे सर संयोजक, क्रीडा संकुल यवतमाळ, मान, श्री उमेश व्यास सर, मान. दत्ता पेंडूरकर सर
सहाय्यक पोलीस निरीक्षक, संस्था अध्यक्ष मान श्री रमेशजी वि. सुंकुरवार, संस्था सचिव श्री राहुल आर सुंकुरवार, मान सौ, कविताताई आर सुंकुरवार, मान सौ पूनमताई के, सुंकुरवार, मान सौ प्राचीताई आर सुंकुरवार, मुख्याध्यापक मान मो, अमीन नुरानी सर उपस्थित होते, सहभागी विध्यार्थी
विजेते स्पर्धक , चमू यांना विविध खेळ स्पर्धेत प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक पटकाविला त्या स्पर्धकांना प्रमाणपत्र, पदक, परितोशिक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले,, विध्यार्थी यांच्या शैक्षणिक कला गुण सोबतच खेळाचे सुद्धा महत्व आहे, मोबाईलचा वापर कमी करावा, अभ्यास करून झालेनंतर दिवसात थोडा वेळ खेळा करीता राखीव ठेवावा, यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होईल.असे अध्यक्ष महोदय यांनी सांगितले. अखेर आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यांत खाऊचे स्टॉल लावण्यात आले होते, सर्वांनी त्याचा लाभ घेतला कार्यक्रमांचे संचालन, मोहना वानखेडे, प्रियंका दानव, सूरज कडकर तर आभार गुडीया पाठक, निशा शेख यांनी मानले, कार्यक्रम यशस्वितेकरीता सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले,,