मेट गोविंदपुर येथे होळी आणि शिमगा सणाचा उत्साह शिगेला



जिल्हा प्रतिनिधी: प्रविण जोशी

ढाणकी पासून जवळच असलेल्य मेट गोविंदपुर येथे विपुल प्रमाणात बंजारा समाजाची वस्ती वसलेली आहे व या समाजात होळी आणि रंगपंचमीचे अनन्यसाधारण महत्त्व असून गेल्या पंधरा दिवसांपासून तांड्यावर व वाड्या वस्तीवर डपड्यांचा आवाज घुमत होता आणि वर्षभर कामात व्यस्त असून एरवी कधीही काम करण्यास कंटाळा न करणार समाज या सणाची व या क्षणाची बंजारा समाज आतुरतेने वाट बघत असतो या क्षणी ही बांधव मंडळी होळीचा सण अगदी दिवाळी सारखाच मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो विशेष म्हणजे पारंपारिक बंजारा लोकगीत समाजाच्या व आजूबाजूच्या संस्कृतीचे आकर्षण असते आणि होळीच्या आधी येणाऱ्या पौर्णिमेपासूनच बंजारा समाजाच्या होळी उत्सवाला सुरुवात होते विविध गीतांची यावेळी मांदियाळी बघायला मिळाली लेंगी गीत बंजारा समाजाच्या होळी दरम्यान पाल, गैर, भगवा, धुंड अशा विविध प्रथा आणि परंपरा यावेळी बंजारा समाज बांधव जोपासत असताना दिसत होता तसेच होळी उत्सव गुढीपाडव्यापर्यंत चालतो होळीच्या पर्वामध्ये ठेका धरून म्हणली जाणारी पारंपरिक लोकगीत जसे की “बोल भाई बोल, बोल र तू साटार कमाई काढ रे तू बोल भाई बोल,बोल र तू रुयेरी कमाई काढ र तू अशी गीत ऐकावयास येत होती या उत्सवात माता भगिनींचा उत्साह मात्र ठळकपणे व हिरीरीने सहभाग दिसून आला तसेच दूर दूर कामानिमित्ताने विखुरलेल्या गेलेली माणसे यानिमित्ताने एका जागी येऊन आपल्या ज्येष्ठांना भेटून त्यांच्याप्रती एक आदरयुक्त भावना व्यक्त करताना अनेक ठिकाणी बघितले व सुखदुःखाची देवाण-घेवाण सुद्धा केल्या जाते म्हणून या होळी आणि शिमगा उत्सवाला बंजारा समाजामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असते व ज्या लोकांच्या घरी मागील वर्षात काही दुःखद घटना झाल्या असतील तर होळी दहन करायच्या आधी दुःखद घटना झालेल्या घरी जाऊन सांत्वन पर भेट देऊन आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत व पाठीशी उभे आहोत अशा प्रकारची सहानुभूती व्यक्त करून दुःख बाजूला सारून सणाच्या आनंद घेण्यास प्रवृत्त करतात

चौकट

डोंगऱ्या पायथ्याशी राहणारा समाज असून होळी शिमगा सण हा खूप महत्त्वाचा मानत असतो मेहनती गुणांनी वैशिष्ट्यपूर्ण आणि काबाड कष्टाला आणि कर्मालाच देव मानून व याडी जगदंबा व संत शिरोमणी सेवालाल यांच्या वचनाला मानणारा शांतताप्रिय असा समाज या सणाला विशेष महत्त्व देतो व समाजाला दिशा व मार्गदर्शक व महाराष्ट्राच माजी मुख्यमंत्री हरितक्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांच्या बद्दल सुद्धा आदरयुक्त गीत बोली भाषेतून गायले जातात.

ज्ञानेश्वर गोविंद चव्हाण(उच्च विद्याविभूषित)