
:-
कारंजा (घा):-जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी सहेली महिला मंचतर्फे कारंजा नगरीतील एकत्र कुटुंब पद्धती अजूनही चालविणाऱ्या कुटुंबातील स्त्रियांचा सत्कार करून,आजच्या युगात जिथे विभक्त कुटुंब पद्धती कडे सर्वांचा कल असतो, स्वतंत्र जीवन जगण्यासाठी एका घराचे चार घरे होताना आपल्याला दिसून येते आणि म्हणूनच आज एकत्र कुटुंब अतिशय बोटावर मोजण्याइतके आहे ,म्हणूनच त्यांच्या घरी जाऊन शाल, पुष्पगुच्छ, आणि मिठाई देऊन त्यांचा गौरव करून त्यांचा आदर्श समाजासमोर ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न सहेली महिला मंच ने केला आहे.त्यात भिलकर ,दर्यापुरकर, प्रांजले ,बनकर ,शेख,राऊत,मस्केया कुटुंबाचा समावेश सत्कारा साठी करण्यात आला.प्रत्येक घरी जेव्हा सहेली नी भेट दिली तेव्हा कुटुंबातील स्त्रियांनी आठवणींना उजाळा देत अश्रूंना वाट मोकळी करून दिली.संयोजिका माधुरी जसुतकर यांनी प्रास्ताविक सादर केले.ज्येष्ठ सखी सविता भांडवलकर ,संगीता मांडवकर, संध्या उपाध्ये, रजनी धांदे ,शुभांगी मरघडे, चित्रा काळे या सहेलिनी त्या कुटुंबाची वैशिष्ट्ये सांगत शब्दांनी त्यांचा गौरव केला.कारंजा नगरीतील नगराध्यक्षा स्वाती भिलकर तसेच अश्विनी चाफले या साखिनी आपले अनुभव मांडले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहेलिनी अथक परिश्रम घेतले.संयोजिका माधुरी जसूतकर यांनी सर्वांचे आभार मानले.
