
सहसंपादक -रामभाऊ भोयर
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्य शिवसेना तालुका राळेगाव द्वारा आयोजित हास्य सम्राट डॉ. मिर्झा अहमद बेग (झी टी व्ही मराठी हास्यसम्राट उपविजेते ) यांचा आज दिं ११ मार्च २०२३ रोज शनिवारला तुफानी विनोदी हास्यांच्या फवाऱ्यांचा कार्यक्रम संपन्न झाला. अनेक खुरमरीत व हजरजबाबी विनोदी किस्से सांगत उपस्थितांना खळखळून हसविले. विविध आर्थिक तथा मानसिक ताणतणावात जीवन जगताना केवळ विनोदानेच आपण सुदृढ, सक्षम तसेच तणावमुक्त राहू शकतो हेच हेरून शिवसेना राळेगाव येथील पदाधिकाऱ्यांनी मिर्झा एक्स्प्रेस चा कार्यक्रम आयोजित केला असे अध्यक्षीय भाषणात यवतमाळ जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख मा.हरिहरभाऊ लिंगणवार यांनी मत व्यक्त केले. यावेळी राळेगाव येथील उच्चन्यायालयातील प्रसिद्ध वकील ऍड. अल्पेश देशमुख व ऍड.मुके यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक शहर प्रमुख नगरसेवक डॉ.संतोष कोकुलवार यांनी केले, आभार प्रदर्शन शिवसेनेचे शहर संघटक संदीप पेंदोर यांनी केले. कार्यक्रमाला तालुका शिवसेना प्रमुख मनोज भोयर, नगरसेवक शशिकांत उर्फ बाळू धुमाळ, अल्पसंख्याक आघाडी तालुका अध्यक्ष चाँदभाई कुरेशी, उपशहर प्रमुख नितीन हिकरे, महिला आघाडी तालुका प्रमुख सौ. रंजना केराम, महिला आघाडी शहर प्रमुख सौ. पार्वतीबाई मुखरे, दिवाकराव जवादे, किशोर वाघ इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन आशिष कडू यांनी केले.
