
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
यवतमाळ
पुसद:हवामान खात्याने दि.१४ मार्च पासून सर्वत्र अवकाळी पाऊस ,गारपीट व वादळी वारे वाहण्याचा इशारा दिलेला असून या पार्श्वभूमीवर व तसेच बाजार समितीतील यार्ड मध्ये टीएमसी व मुख्य बाजार आवार येथे हरभरा ,सोयाबीन, तूर या शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे माल ठेवण्यास जागा नसल्यामुळे तालुक्यातील शेतकरी, अडते बांधवांना सुचित करण्यात येते की, सद्यस्थीतीत बाजार समितीचे टि.एम.सी. बाजार आवार व मुख्य बाजार
येथे हरभरा, तुर व सोयाबिन, शेतमालाची आवक मोठया प्रमाणात झालेली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी हवामानाचा अंदाज घेऊन शेतमाल विक्री करीता आणावा. शक्य असल्यास पाऊसाचे वातावरण निवळल्यानंतरच शेतमाल विक्रीकरीता आणावा. शेतमाल विक्रीकरीता आणतांना ताडपत्री सोबत आणावी जेणेकरुन अवकाळी पाऊस आल्यास
शेतमालाची सुरक्षा करणे सोईचे होईल. तसेच अडते बांधवांनी दि. १४ मार्च पासुन शेतकऱ्यांचा कोणताच शेतमाल दि. १९ मार्च पर्यंन्त विक्रीकरीता बोलावु नये. जर सदर कालावधीत त्यांनी शेतकऱ्यांचा शेतमाल बोलाविल्यास त्याच्या सुरक्षेची संपुर्ण जबाबदारी अडते यांची राहील. असे आव्हान एस. डी. मगर सचिव कृषि उत्पन्न बाजार समिती पुसद यांनी केले आहे.
