खासदार रामदास तडस यांचे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

हिंगणघाट /प्रमोद जुमडे

भारतीय जनता पक्षाचे वर्धा लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार खासदार रामदास तडस यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. स्थानिक विठोबा चौकात स्थित प्रचार कार्यालयाचे खासदार रामदास तडस यांनी फित कापून उद्घाटन केले. यावेळी आमदार समीर कुणावार, आमदार डॉ. रामदास आंबटकर , भाजपा वर्धा जिल्हाध्यक्ष सुनील गफाड , लोकसभा प्रभारी सुमित वानखेडे ,सविता गाखरे ,भाजपा वर्धा जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे, जिल्हा सचिव प्रा. किरण वैद्य , वामनराव खोडे,भाजपा महामंत्री आकाश पोहाने, संजय डेहने, विनोद विटाळे, आशिष परबत ,अनिल गाहेरवार ,प्रमोद जुमडे, अमोल त्रिपाठी, संजय माडे, मुन्ना त्रिवेदी, खुशाल शेंडे आदींची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार समीर कुणावार यांनी खासदार तडस यांना हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातून मोठे मताधिक्य मिळेल. असा विश्वास प्रगट केला. खासदार तडस यांनी वर्धा लोकसभा मतदारसंघात गत दहा वर्षात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली असून या कामांची पावती विजयाच्या रूपात जनता जनार्दन कडून मिळेल. असा विश्वास प्रकट केला तसेच पंतप्रधान मोदी यांच्या शासन काळात विविध कल्याणकारी योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचल्या. त्यामुळे या देशातील जनता सलग तिसऱ्यांदा मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान करणे निश्चित आहे . असा विश्वासही सरतेशेवटी त्यांनी प्रकट केला.