ढाणकी शहरात महालक्ष्मी माता उत्सव घरोघरी आनंद साजरा,प्रमोद चोधरी यांच्या घरी गौराईचा आकर्षक देखावा


प्रतिनिधी::प्रवीण जोशी


ढाणकी शहरात सुद्धा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ज्येष्ठा गौरीउत्सव मोठ्या आनंदात घरोघरी साजरा करण्यात आला. तसेच यावेळी शहरात ठीक ठिकाणी महाप्रसादासह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. गौराई महालक्ष्मी मातेचे मोठ्या उत्साहात पूजन करण्यात आले.

दीड दिवसाची महालक्ष्मी माता म्हणजे गौराई माता हिचे आगमन झाले ते खास आकर्षक देखावे घरोघरी तयार करण्यात आले होते. यावेळी शहरात दुकाने सजलेली होती. खरेदी करता सुद्धा मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी बघायला दिसून आली. जिकडे पहावे तिकडे महालक्ष्मी गौराई पूजनाची धाम धूम होती. महालक्ष्मीचे सर्वांकडे पूजन व आरती मोठ्या भक्ती भावाने करण्यात आली. यावेळी महाप्रसाद सुद्धा झाला. या महाप्रसादाला अत्यंत महत्व दिले जाते. अनेक भाविक भक्त महालक्ष्मी दर्शनासाठी उत्सुक असतात आरती आणि प्रसादासाठी मोठ्या आतुरतेने वाट बघतात. आकर्षक देखावे लाइटिंग, हार, फुलांनी, महालक्ष्मीची सजावट केल्या गेली होती. अनारसे, करंजी, पुरणपोळी, लाडू, अनेक असे पदार्थ नैवेद्य म्हणून ठेवले होते. प्रसादामध्ये आंबिलीचे खूपच महत्त्व असते इष्ट मित्रांना निमंत्रण देऊन प्रसाद ग्रहण करण्यासाठी बोलवल्या जाते अनेक भक्तगण दर्शनासाठी जातात व आपल्या मनोकामना महालक्ष्मी मातेसमोर मांडतात. यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात महालक्ष्मीचे आगमन ढाणकी शहरासह आजूबाजूच्या खेड्यापाड्यातही झाले होते. मोठ्या उत्साहात गौराई महालक्ष्मी मातेचे पूजन करण्यात आले. आपल्या पारंपारिक गोष्टी ज्या लुप्त होत चालल्या कुठेतरी त्या बाबीची आठवण म्हणून हा गौरी गणपतीचा एक आगळावेगळा देखावा येथील प्रमोद चौधरी यांच्या कडे केला असून हा देखावा बघण्यासाठी अनेकांनी आवर्जून उपस्थिती लावली होती.