
सहसंपादक -रामभाऊ भोयर
यवतमाळ जिल्ह्यात घरकुलांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून लाभार्थ्यांना घरकुलाचे काम पूर्ण करण्यासाठी मार्च महिन्याची शेवटची तारीख दिली असून बांधकामात रेती हा महत्त्वाचा घटक असून यवतमाळ जिल्ह्यातील पूर्ण रेती घाट बंद असल्याने घरकुलाच्या कामाला पूर्णविराम मिळाला असून शासनाचा अंजेडा मार्च महिन्यात पूर्ण करण्याचा असून घरकुलाचा लाभार्थी अडकित्यात सापडला असून ईकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था लाभार्थ्यांची झाल्याचे पाहून सरपंच संघटना त्यांच्या मदतीला धावून आली असून सरपंच संघटनेच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यातील रेती घाट सुरु करण्यात यावे या मागणीसाठी आज दिनांक 17/3/2023 ला जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले असून सोबतच एम.आर.ई.जी.एस.अतंर्गत सुरू असलेल्या विहीरीच्या कामासाठी दरपत्रकावर ग्रामसेवक सह्या करत नसल्याने ती कामे सुद्धा रखडली आहे. सोबतच ई क्लासच्या जमीनीचे पट्टे व जमीनीचे अधिकार ग्रामपंचायतीला देण्यात यावे.अशा अनेक मागण्या घेऊन अशा आशयाचे निवेदन देण्यात आले असून या प्रकरणी ताबडतोब लक्ष वेधून उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी सदस्य किशोर धामंदे, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष वर्षाताई निकम, यवतमाळ जिल्हा संपर्कप्रमुख निश्चल माणिकराव ठाकरे, सरपंच संघटनेचे राळेगाव तालुका अध्यक्ष अंकुश मुनेश्वर, राळेगाव तालुका सचिव राजेंद्र तेलंगे,मोहन नरडवार,प्रसाद ठाकरे , प्रविण झोंटीग,आशिष पारधी,निलेश पेंदोर, स्वप्निल जयपूरकर,अजय पिंपरे, जनार्दन मरसकोल्हे, किशोर हिवरकर, प्रकाश पोपट,शंकर राऊत, श्रीकांत राऊत, नारायण इंगोले, पिंपळापुर सरपंच चौधरी यांचे सह अनेक गावांतील सरपंच उपस्थित असल्याची माहिती अंकुश मुनेश्वर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.