चुरमुरा ,उमरखेड
लोकहित महाराष्ट्र उमरखेड
तालुका प्रतिनिधी: संदीप जाधव
आज दिनांक 18 /3 /2023 शनिवार रोजी मेट या गावांमध्ये औरस- चौरस शेतात चार इंचांचा थर जमिनीवर साचला यामध्ये शेतकऱ्यांचा फार नुकसान झाला. गहू व चना काढताना अचानकच वादळ हवा पाणी आणि गारा यांचा वर्षाव सुरू झाला, गहू वचण्याचा डिग जागी दडला, एक तर पावसाने कापूस आणि सोयाबीनचे नुकसान केलं, आणि या गारा व वाऱ्याने गव्हाचे आणि चण्याचे नुकसान केलं, एक तर शेतातल्या या हंगामाला पिकलं तेही जसं तोंडातलं घास देवाने ओढून नेलं! तसंच सरकारने पण कमीत कमी दर भाव यांचा आड घेऊन, शेतकऱ्यांना कुंजुन टाकलं, बिचारा शेतकरी काय करणार मेहनत आणि पैसे वाया गेले. त्यांनी कुणाजवळ हात पसरावे, कुणाकडे आंदोलने करावी, आजवर चालत असलेली आंदोलन, ज्यांना 70 हजार एक लाख पर्यंत पगार आहेत, त्यांनी पण पेन्शन साठी आज तहसील समोर आंदोलन करत आहेत,
ज्या शेतकऱ्याच्या भरोशावर जीवन जगताहेत त्यांना हमीभाव नाही, आणि त्यांचा विचारही नाही, देवाने पोटावर लाथ मारली आणि गाराची वर्षाव केली संपूर्ण शेतकरी उध्वस्त झालेत. पावसाळ्यामध्ये तर पुराणी ग्रासलेला शेतकरी आजवर आत्महत्या करणार नाही तर काय करणार!
