
प्रतिनिधी:: प्रवीण जोशी
यवतमाळ
जीवन हे अनमोल आहे त्यामुळे इतरांना दुःख देऊ नका.”जगा आणी दुसऱ्यांना जगु द्या” हा संदेश देणारे “भगवान महावीर जयंती” निमीत्य आज ढाणकी शहराच्या मुख्य मार्गावरून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.यावेळी मोठ्या संख्येने जैन समाज बांधव, भगिनी शोभायात्रेत सामील झाल्या होत्या
४ एप्रिल रोजी ढाणकी शहरात भगवान महावीर यांची जयंती उत्साहात व तेवढ्याच शांततेत पार पडली हल्ली आपण बघतोच आहे जयंती आणि मिरवणुका म्हणल्यानंतर कर्ण कर्कश मोठी वाजंत्री लावून गाण्यावर ठेका धरून नाचणारी मंडळी बघितली त्यामुळे सर्वसामान्यांना त्रास होतो आणि हा ध्वनी मानवाला घातक आणि हानिकारक असतो यावेळी जैन बांधवांच्या स्थानकापासून शोभायात्रा निघाली होती यावेळी भगवान महावीरांनी सर्वसामान्यांना त्रास होईल आपल्यामुळे कोणी दुखावल्या जाऊ नये व मांसाहार न करता जास्तीत जास्त फलाहार व शाकाहार करावा याचे महत्त्व सांगण्यात आले सामाजिक एक्यता शांतता कशी नांदेल अशा घोषणा देत ही शोभायात्रा निघाली होती भगवान महावीरांनी गावोगाव फिरून जैन धर्माचा प्रचार व प्रसार केला त्यांची शाकाहार अहिंसा इत्यादी तत्वे सर्वांनाच लाभदायक आहेत ऋषभनाथ हे जैन धर्माचे मूळ संस्थापक त्यानंतर जैनात एकूण 24 तीर्थकार झाले त्यापैकी शेवटचे तीर्थकार हे वर्धमान महावीर होत स्त्री पुरुष समानतेच्या तत्त्वाचा प्रचार व प्रसार केला तत्कालीन काळात भगवान महावीरांनी हा घेतलेला निर्णय वाखाण्याजोगा होता यावेळी निघालेल्या शोभायात्रेत मोठ्या संख्येने जैन समाज बांधव व भगिनी सामील झाल्या होत्या