रामनवमी उत्सव व जगन्नाथ बाबा जन्मोत्सव निमित्त शोभायात्रा उत्साहात पार

विठ्ठल रुखमाई देवस्थान समिती अहेरीद्वारा संचालित विठ्ठल मंदिर लालगुडा इथे रामनवमी उत्सव व जगन्नाथ बाबा जन्मोत्सव निमित्त शोभायात्रा काढण्यात आली. या शोभयात्रेत प्रभू श्री राम घोड्यावर स्वार असलेली पूर्णपणे लाकडाने बनलेली मूर्ती आकर्षणाचा विषय ठरली. 100 वर्षाचे वर सुरु असलेली परंपरा कोरोना काळात व अहेरी गाव पूर्वसन प्रकियेत खंड पडली होती. ती आता लालगुडा गावात नवीन मंदिरात नव्याने सुरु झाली आहे.सकाळी श्रीराम जन्म पूजाविधी करण्यात आली, राम कथा वाचण्यात आली. त्यानंतर गुरुदेव सेवा भजन मंडळ अहेरी यांनी आपली भजन किर्तन सेवा सादर केली. त्यानंतर काल्याचे कीर्तन झाले.व सायंकाळी गावात शोभायात्रा काढण्यात आली. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व भाविक भक्तांनी परिश्रम घेतले,,,