चातारी येथे दारूच्या वादात तरुणाला मारहाण करत तळ्यात फेकले? नागरिकांची चर्चा

उमरखेड तालूका प्रतिनिधी :विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण)

उमरखेड तालुक्यातील चातारी येथे अवैध दारू विक्री करणाऱ्या काही व्यक्तींनी संतोष हिरामण भिसे वय 25 या तरुणा सोबत दारू देण्या – घेण्यावरून वाद घातला आणि या वादातून त्याला अवैध दारू विकेल्यानी बेदम मार मारत तळ्यात फेकून दिले अशी चर्चा ऐकायला मिळत आहे .काल त्याचे मृत शरीर सापडले नव्हते. पण आज तळ्यात मृतदेह आढल्याने खळबळ माजली आहे. ठाणेदार माळवे यांच्या मार्गदर्शना खाली उमरखेड पोलीस तपास करत आहेत . चातारी – बोरी – ब्राह्मणगाव व जवळपासच्या सर्व खेड्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होत असून पोलिसांनी कार्यवाही करावी अशी मागनी आहे