
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील खैरी येथील वार्ड नंबर ३ मधील बुद्ध विहारामध्ये पोलीस उप-अधीक्षक पाटील साहेब व महल्ले साहेब पोलीस स्टेशन वडकी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.
त्यानंतर मुख्य मार्गाने महादेव मंदिराजवळून ते नारायणपूर या परिसरात भव्य शोभयात्रा काढण्यात आली. या दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने खैरी परिसर दणानला. या शोभायात्रे दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच खैरी, छत्रपती संभाजी महाराज मित्र परिवार खैरीचे समस्त सदस्य तथा बौद्ध समाज बांधव व गावकरी यांच्या उपस्थितीत भव्य शोभयात्रा पार पडली. या दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तगडा पोलीस बंदोबस्त होता. सदर कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. यावेळी पोलीस उपअधीक्षक पाटील साहेब तथा महाले साहेब ठाणेदार पोलीस स्टेशन वडकी यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच व गावकऱ्यांनी समस्त पोलीस कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
