
सहसंपादक -रामभाऊ भोयर
जिल्ह्याचे पालक मंत्री तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री माननीय ना.संजयभाऊ राठोड यांनी आज कोच्ची या जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या गावी भागवत सप्ताहानिमित्यांने भेट दिली असता तेथील अडचणी जाणून घेत त्यांचा लवकरात लवकर निपटारा करण्यात येईल असे आश्वाशीत केले.
जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अण्णा व औषध प्रशासन मंत्री माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांनी कोची येथील भागवत सप्ताह ला भेट देण्यापूर्वी वडकी येथे उडान पुलाखाली महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर खैरी येथे शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाच्या शाखा फलकाचे अनावरण करून कोची येथील श्रीमद् भागवत कथा तथा व्यसनमुक्ती सप्ताहाला भेट देऊन तेथील जनतेच्या समस्याचा निपटारा लवकरात लवकर करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनीदिले.
यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा संपर्क प्रमुख मा.हरिहरभाऊ लिंगनवार, तालुका प्रमुख मनोज भोयर, राळेगाव शहर प्रमुख संतोष कोकुलवार, शहर संघटक संदीप पेंदोर, संजय काकडे, शैलेश बेलेकर, सुधाकर गोखले, अंकुश गव्हाणकर सरपंच कोच्ची, कोकाटे उपसरपंच, देविदास जवादे सदस्य ग्रा.प., कोच्ची , हरिदास हरबडे, किशोर वाघ, अभिजीत मांडेकर सरपंच सावंगी, समीर भेदूरकर, दिलीप बदकी प्रभारी तहसीलदार राळेगाव, बाबाराव पोटे मंडळ अधिकारी वडकी, महादेव सानप मंडळ अधिकारी किन्ही(जवादे), खडसे तलाठी, विजय महाले ठाणेदार वडकी, यासह कोची येथील भागवत सप्ताहातील भाविक भक्त व कोच्ची ग्रामवासी उपस्थित होते.
