संस्कृती संवर्धन विद्यालयात बालिकादिन उत्साहात संपन्न

राळेगाव : दि.३जाने.२०२३ : (स्थानिक ) येथील संस्कृती संवर्धन विद्यालयात आद्य शिक्षिका – मुख्याध्यापिका, थोर समाजसुधारक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ‘ बालिकादिन ‘ म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते हंसवाहिनी माता सरस्वती आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून, दीप प्रज्वलित करण्यात आले.

6

त्यानंतर सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित विविध उपक्रम – वक्तृत्व, निबंध, वेशभूषा ,काव्यगायन घेण्यात आले. कु.स्नेहा सोनटक्के, रोशनी कार्लेकर, मानसी आडे, आयुष वासेकर, मयुरी मडावी, पूर्वा कुसाम, प्रणाली पुरके, संचिता वनकर, संदेश नागपूरे, गणेश झाडे, गायत्री जुमनाके, रक्षा तोडसाम, माधवी शिवरकर, वेदांती चौधरी, ऋतुजा भोकरे, मेघा चौधरी ,नव्या नैताम, चांदणी मेश्राम, सलोनी मोहिते, प्रतिक धतकर,ध्रुव सातपुते, सुहानी गेडाम, कार्तिक धतकर, जान्हवी नागपुरे, कविश्वरी सावरकर, पल्लवी खुडसंगे, मयुरी मडावी, जान्हवी काटकर, स्नेहगंधा डोये , प्राजक्ता वागदे ,संचिता वनकर,आकांक्षा उईके,जान्हवी वेटे ह्या विद्यार्थ्यांनी उपक्रमात हिरिरीने सहभागी होत कार्यक्रमाची शोभा वाढविली. कु. जान्हवी काटकर हिने ” मी सावित्री बोलतेय ” ही सुंदर एकांकिका सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळविली. डॉ.पोटदुखे मॅडम यांचेकडून तिला बक्षीस जाहीर झाले. मान्यवरांमध्ये मा. अहिल्याबाई माकोडे, मोहिनी बोबडे, डॉ. पोटदुखे, मीनाक्षी येसेकर, सीमा देशमुख आदींची यथोचित भाषणे झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राळेगाव नगरपंचायत येथील महिला व बालकल्याण सभापती मा. मोहिनी बोबडे ह्या होत्या. कु. समिक्षा तेलंग हिने सूत्रसंचालन तर आभार प्रदर्शन कु.स्नेहा सोनटक्के या विद्यार्थिनींनी मानले.
याप्रसंगी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा शाळेच्या वतीने पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला. यात सौ. मोहिनी बोबडे, यवतमाळ जिल्ह्याची पी.टी.उषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेवानिवृत्त आदर्श शिक्षिका – मुख्याध्यापिका मा. अहिल्याबाई माकोडे , बाल व महिला प्रसुती तज्ञ डॉ. सविता पोटदुखे, ‘सलाम बॉम्बे’ अंतर्गत व्यसनमुक्त चळवळीच्या अध्यक्षा तथा सक्रिय कार्यकर्त्या अॅड. रोशनी कांबळी वानोडे, पाटबंधारे विभागाच्या सौ. विद्याताई निंबाळकर यांचा समावेश होता. मुलांना खाऊवाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दिनकर उघडे, राकेश नक्षिणे, योगेश मिटकर, ज्ञानेश्वरी आत्राम , सलमा कुरेशी, भाग्यश्री काळे, प्रकाश अंबादे, अनंता परचाके, मुकुंद मानकर, विलास ठाकरे यांनी अथक मेहनत घेतली.