
सहसंपादक -रामभाऊ भोयर
मुस्लिम बांधवांच्या सुरू असलेल्या रमजान महिन्यातील रोजा व ईद निमित्त दि.१७ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वा.पोलीस स्टेशन वडकी येथे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष रसुलभाई शेख,प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील,पांढरकवडा पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार,सहायक पोलिस निरीक्षक विजय महाले,मौलाना नदीम खान,आर,एफ,ओ मयूर सुरवसे,सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण लिंगाडे,सहायक पोलिस निरीक्षक हेमराज कोळी,इत्यादी विराजमान होते.
समाजातील सर्व घटकांमध्ये एकोपा वाढीस लागून शांतता नांदावी या विचाराने वडकी पोलिसांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यात पांढरकवडा पोलीस उपविभागाने पुढाकार घेतला होता. रोजा इफ्तार सर्व धर्मीय संमेलन पार्टीचे आयोजन वडकी पोलीस ठाण्यात करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन सचिन नेवारे यांनी केले.तर आभार प्रदर्शन ठाणेदार विजय महाले यांनी केले.
याप्रसंगी रमजान महिन्यातील रोजाचे महत्व जामा मस्जिद चे काजी नदीम खान यांनी उपस्थितांसमोर विशद केले.
अशा आयोजनाने एकात्मता प्रेम आणि सद्भावनेचा मोठा संदेश मिळतो असे मत उपविभागीय पोलीस पाटील प्रदीप पाटील यांनी व्यक्त केले.तसेच वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय महाले यांनी बोलताना आम्ही सर्व अधिकारी कर्मचारी अधर्मीय आहोत परंतु सर्व धर्मीयांना एकत्रित करून जातीय सलोखा ठेवण्याचे संदेश देण्याचे काम आम्ही करीत आहो असे सांगितले.या इफ्तार पार्टीतून सामाजिक एकोपा अबाधित ठेवण्याचा अनेकांनी निर्धार केला,
यावेळी विविध मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले व पारंपारिक पद्धतीने इफ्तार ला सुरुवात करण्यात आली.
या इफ्तार पार्टीला उपसरपंच शैलेश बेलेकर,माजी सरपंच दिलीप कडू,माजी सरपंच डॉ नरेंद्र इंगोले,पोलीस पाटील पुरुषोत्तम निमरड,शेरअली लालानी,अयुबखा पठाण,साजिदभाई शेख,वैकुंठ मांडेकर, यासह विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी पत्रकार बांधव,पोलीस पाटील, संघटनेचे पदाधिकारी व सर्व शांतता कमिटीचे सदस्य मुस्लिम बांधव व सर्व पोलीस कर्मचारी उत्साहाने उपस्थित होते.
