
सहसंपादक:रामभाऊ भोयर
शासनाच्या वतीने नियमित कर्जदार सभासदांना महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी सन्मान योजने अंतर्गत पन्नास हजार रुपयांचे अनुदान द्यायचे शासनाने ठरवले पण आजतागायत ते न दिल्याने ते देण्यात यावे अशी मागणी राळेगाव ग्राविकाच्या वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहेत राळेगाव ग्राविकाने 268 सभासदांची माहिती शासनास पाठवली होती त्यापैकी 177 सभासदांचे आधार प्रमाणीकरण झाले परंतु केवळ 177 पैकी 133 सभासदांना अनुदान प्राप्त झाले उर्वरित 44 सभासदांचे अनुदान प्राप्त झाले नाहीत आणि 91 सभासदांचे अजून पर्यंत आधार प्रमाणीकरण प्राप्त झालेले नाहीत तरी राहिलेल्या कर्जदार सभासदांना तात्काळ पन्नास हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे तसेच राहिलेल्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करावे असे मागनि निवेदनात करण्यात आली आहेत सोबतच जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज वाटप करण्याकरता जे धोरण आखण्यात आले त्यामध्ये कर्ज वाटपात अतिशय कमी वाढ करण्यात आली आहे सद्यस्थितीत बियाणे खते तसेच मजुरी वाढल्यामुळे जिल्हा बँकेने 5% केलेली कर्ज वाढ ही अतिषय तोकडी आहे ती दहा ते पंधरा टक्के करण्यात यावी सोबतच शेतकरी सभासदांना ऑनलाइन पेरवा भरताना तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागतो त्यामुळे शेतकऱ्यांना ऑनलाइन पिकाचा पेरवा भरणे शक्य झाले नाही अशा शेतकऱ्यांना स्वयंघोषणापत्र भरून कर्ज वाटप करण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे निवेदन तहसीलदार दिलीप बदकी सहाय्यक निबंधक कैलास खटारे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखा व्यवस्थापक तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकांना देण्यात आले आहेत निवेदन देताना संस्थेचे अध्यक्ष सचिन हुरकुंडे उपाध्यक्ष राजेश काळे संचालक जानराव गिरी विनायक नगराळे कृष्णाराव राऊळकर तातेश्वर पिसे प्रभाकर राऊत अशोक पिंपरे विनोद नरड गजानन पाल नितीन महाजन विभा गांधी ज्योती डाखोरे प्रकाश मेहता उपस्थित होते.
