दराटी ग्रामपंचायत कार्यालयाचा मनमानी कारभार ( ग्रामपंचायत सदस्य उपसरपंचच घरकुलाचे लाभार्थी )

प्रतिनिधी :- संजय जाधव

दराटी हे गाव उमरखेड तालुक्यातील ग्रामीण बंदी भागात आहे, या गावात जास्तीत जास्त नागरिक मोलमजुरी करणारे आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय दराटी चे सरपंच उपसरपंच सचिव हे हम बोले सो कायदा करून दंडेलशाही मनमानी कारभार करत आहे,2020 पासून दि.25/04/2023, पर्यंत एकही ग्रामसभा घेण्यात आली नाही. ग्रामसभेतून रोजगार सेवक निवडण्यात आला नाही.एम आर. जी. एस. या योजना राबवत असताना बोगस व निकृष्ट कामे करण्यात आले. गोरगरीब मजुराच्या हाताने काम करून घेता मशीनच्या साह्याने कामे करण्यात आली. बिल मस्टर च्या आधारे काढण्यात आले. शासनाने गरीब मजुरांना काम मिळावं म्हणून अनेक निधीतून योजना दराटी या गावाला दिल्या मात्र जेसीबीच्या साह्याने कामे करून गरीब दिन दुबळ्या मजुरांवर उपासमारीची वेळ सरपंच व सचिव ग्रामपंचायत दराटीच्या गाव चालीवनाऱ्या प्रतिष्ठित लोकांनी आणली आह.त्यामुळे मजुराच्या हाताला काम नाही. छोट्याशा गावामध्ये रोजगाराचे कोणतेही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे उपासमारीने तळपळत मरण्यापेक्षा दराटी येथील मजूर शहराकडे काम करण्याकरिता स्थलांतरित होत आहेत. घरकुल योजना खरोखर गरीब लाभार्थ्यांना न देता धाब्यावर बसून ज्याच्याकडून आर्थिक सहाय्य होईल त्यांना घरकुलाचा लाभ देण्यात येत आहे. आपल्याच हाती सत्ता आहे असा दाखवणारे उपसरपंच व सदस्य यांनी स्वतःच घरकुल चा लाभ घेतला आहे. प्रत्येक गाव विकासाच्या अनेक फंडाच्या माध्यमातून कामे करण्यात आली. मात्र दर्जा हीन मटेरियल वापरून निकृष्ट कामे करून निम्म्याच्या वर रक्कम ग्रामपंचायतचे सरपंच सचिव साहेबांनी हडप केले आहे असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
घर टॅक्स कर वसुली, पाणी फिल्टर चे दररोज जमा होणारे रुपया चा रुपयांचा पण हिशोब नाही, गावातील नागरिकांनी सरपंच व सचिव साहेबांना विचारणा केली की, त्यांचे उद्घाटपणे उत्तर आम्हाला सर्व समजते,,, कोणत्या तुटक्यानी सांगण्याची गरज नाही. तू जर जास्तीचा शहाणपणा करत असशील तर तुला घरकुलाचा लाभ मिळू देणार नाही, अशा धमक्या देऊन नागरिकांना चूप करण्यात येते. ग्रामपंचायत कार्यालय दराटी यांच्या अशा दंडेलशाही कारभाराला कंटाळून गटविकास अधिकारी पं, स, उमरखेड येथे गावकऱ्याच्या वतीने तक्रार देण्यात आलीआहे. नरेंद्र अशोक राठोड,प्रकाश पुंडलिक घुले, राम सिंग राठोड, मसुद गुलाब हुसेन परान, अशा एकंदरीत 250 गावकरी यांनी तक्रार दिली असून आज पर्यंत कोणताही संबंधित अधिकारी चौकशीला आला नाही. जर लवकरात लवकर ग्रामपंचायत कार्यालय दराटी समक्ष चौकशी करून संबंधितावर कारवाई करून गरीब जनतेला न्याय मिळाला नाही, तर हजारोच्या संख्येने पं. स. कार्यालय उमरखेड येथे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संतापलेल्या गावकऱ्यांनी दिला आहे.