ज्योतिबाची सावली नाट्य प्रयोगाला तुफान गर्दी

सहसंपादक : रामभाऊ भोयर

3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित उन ज्योतिबाची सावली सावित्री माऊली या दोन अंकी नाट्यप्रयोगास राळेगाव कर नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला स्थानिक नगरपंचायत च्या प्रांगणात घेण्यात आला होता छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती व क्रांतीज्योती सावित्री फुले युवा मंच राळेगाव च्या वतीने दोन अंकी नाट्यप्रयोग घेण्यात आला सावित्रीच्या भूमिकेत असलेल्या अपूर्वा सोनार व ज्योतिबांच्या भूमिकेत असलेले जयकुमार चर्जन यांच्या अभिनयाने रसिक मंत्रमुग्ध झाले महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील विविध प्रसंग संगीतमय प्रसंगातून अधोरेखांकित करण्यात आले होते ते रसिकांच्या मनावर घर करून गेले सावित्रीबाईंनी काढलेली पहिली शाळा तेथील विद्यार्थी याचे हुबेहूब चित्रण यावेळी नाट्यप्रयोगातून रेखाटण्यात आले होते तसेच ज्योतिबा फुले यांचा महापरिनिर्वाण चा नाट्य प्रयोग प्रसंग सुरू असताना रसिकांच्या डोळ्यातून अश्रू पडले………….. राळेगावातील ज्येष्ठ शिक्षिकेंचा सत्कार…… याप्रसंगी तत्कालीन सामाजिक परिस्थितीत शिक्षणासारखे पवित्र कार्य करणाऱ्या ७५ वर्षावरील येथील अनुसया दशरथराव शेगेकर व मालती मारोतराव रोडे या वयोवृद्ध शिक्षिकेंचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची उद्घाटन तहसीलदार अमित भोईटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी गटविकास अधिकारी केशव पवार राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री प्रा वसंत पुरके उपनगराध्यक्ष जानराव गिरी यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेविका मोहनी बोबडे व इंजि. शशांक केंढे यांनी केले