विक्रम राठोड यांचेकडून मेट ग्रामपंचायत मधील वॉटर सप्लाय वर चालू बंद करण्यासाठी बसविण्यात आले पहिले आधुनिक यंत्र


लोकहित महाराष्ट्र उमरखेड
तालुका प्रतिनिधी. संदीप जाधव


ग्रामपंचायत मेट येथील रोजगार सेवक युवराज राठोड वॉटर सप्लायार असताना रात्रंदिवस चालू बंद करण्यासाठी 1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीवर मोटरचे बटन दाबण्यासाठी जावे लागत असे त्यांना सतत होणाऱ्या परेशानीमुळे मोटर चालू बंद करण्यासाठी लोक तक्रारकरत व त्यामुळे लोकांना पाणीपुरवठा व्यवस्थित होत नसे, परंतु श्री. विक्रम उत्तम राठोड जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा व प्रभारी सरपंच यांनी गावासाठी पाणीपुरवठा सोपे करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रांना उपलब्ध करून दिले. वॉटर सप्लायर हा आता मोबाईल ॲप द्वारे मोटर चालू बंद करणे तसेच अनेक प्रकारचे कामे कर्मचारी ग्राम पंचायत मध्ये न येता घरी बसून करू शकतो.