प्रभाग क्र.9 मधील नाल्यांचे बांधकाम त्वरित करा,नागरिकांसह एम आय एम ची मागणी

वरोरा शहरातील प्रभाग क्र.9 मधील असलेल्या नाल्याना पावसाळ्यात तुडुंब भरून पूर येतो .नाल्याचे पाणी या भागातील नागरिकांच्या घरात शिरायला सुरुवात होते. या भागातील नाल्याचे पक्के बांधकाम नसल्याने नियोजन शक्य होत नाही .त्यामुळे या भागातील महिलांसह एम आय एम चे पदाधिकाऱ्यांनी नगर परिषद वरोरा ला निवेदन दिले आहे.

वरोरा नगर परिषद ही फार जुनी नगर परिषद असून अजूनही काही भागात मुख्य सुविधा पुरविण्यात अपयशी ठरली आहे.हे इतक्या वर्षांपासून सत्ता भोगत असणाऱ्या नेत्यांचे व त्यांना निवडून देणाऱ्या जनेतची घोडचूक असल्याचे एम आय एम चे तालुकाध्यक्ष मुज्जमिल शेख यांनी सांगितले.