
सहसंपादक : रामभाऊ भोयर
गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंतरगाव येथे आज जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, विद्यार्थ्यांनी गावातुन प्रभातफेरी काढून बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करुन जय घोष केला,या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक भिमराव जी भगत, महेंद्र उमरे, उपसरपंच व अनेक नागरिक उपस्थित होते, राष्ट्रगीत म्हणून प्रभातफेरी विद्यालयामध्ये आली व विद्यार्थिनी नी गोंडी नृत्य सादर केले, संस्कृती, लोकपरंपरा यांचा अनोखा अनुभव गावकऱ्यांनी अनुभवला..
दुसऱ्या सत्रात आरोग्य शिबीर आयोजित करुन सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली, डॉ.विवेक भुडे, कुळसंगे मैडम,गिरजाबाई चंदनखेडे यांनी सहकार्य केले.या कार्यक्रमाला उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले, सर्वांचे धन्यवाद मुख्याध्यापक राजेश शर्मा यांनी मानले.
