
बारावीच्या परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या गुणवंत विध्यार्थ्यांचा लोकेश दिवे सदस्य ग्राम पंचायत चिखली व समस्त मित्रपरिवार तर्फे गुणवंतांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.चिखली गावातुन विज्ञान शाखेत प्रथम आलेला साहिल सतीश पडोळे व वाणिज्य शाखेतून मुलींमध्ये कु.तनु मधुकर जुमनाके या विध्यार्थ्यांचा लोकेश दिवे यांच्या तर्फे पुष्पगुच्छ,शाल,डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुस्तक आणि मिठाई देऊन सत्कार केला.याप्रसंगी विध्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.याप्रसंगी गावातील युवक दुर्वेश उमाटे,मयुर जुमळे,अक्षय ठाकरे,सुरज भोंगाडे,प्रितम कुमरे,साहिल बरडे,गौरव पुडके,सतीशराव पडोळे,मधुकरराव जुमनाके,तसेच मित्रपरिवार उपस्थित होता.
