नागेशवाडी गावातील महिलानी केला वटपौ्णिमा सण साजरा


उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )


हिन्दु पंचांगतील जेष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो ह्या दिवशी स्त्रिया वट पौर्णिमा नावाचे व्रत करतात या व्रतदरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग् य लाभावे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात या दिवशी वडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्य साठी प्रार्थना केली जाते जेष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वाटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते पती पत्नीच्या नात्याला गोडवा वाढवणारा हा सण ज्या दिवशी वडाची पूजा करुन पतीच्या दीर्घायुष्य साठी प्रार्थना केली जाते या व्रताची मुख्य देवता सावित्रीसह ब्राह्महदेव असून सत्यवान नारद व यमधर्म हे इतर देवही येतात भारतात प्रसिद्ध पतिव्रता स्त्री म्हणून सावित्रीलाच आदर्श मानलं जात तसेच तिला अखंड सौभाग्याचे प्रतीकही मानले जाते यदर्माने सत्यवानचे प्राण हरण केल्यावर सावित्रीने त्याच्याशी तीन दिवस शास्त्रचर्चा केली त्यावर प्रसन्न होऊन यदर्माने तीन वट देऊ केले ही शास्त्रचर्चा वटवृक्षा खाली झाली म्हणून वटवृक्षाशी सावित्रीचे नाव जोडले आहे