
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, उमरखेड (ग्रामीण )
आज यवतमाळ जिल्हा पोलीस मुख्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेल्या वाहनाचे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. संजय भाऊ राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. ही वाहने पोलीस दलास सुपूर्त करण्यात आली. या वाहणामुळे जिल्हा पोलीस दलाला नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जलद गतीने काम करण्यास अधिक फायदा होणार आहे. राज्याच्या पोलीस दलाला आवश्यक त्या सुविधा पुरविण्यासाठी शासन कटीबद्ध असून पोलीस दलाचे सक्षमीकरण करण्यात येत आहे. या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक मा. डॉ. श्री. पवन बनसोड व पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
