
सहसंपादक : रामभाऊ भोयर
शिवसेना श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे वर्धापन दिनाचे औचित्य साधून मीना शंकर गायधने शिवसेना माजी नगरसेविका नगरपंचायत राळेगाव यांचे पुढाकारात वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेश पात्रता परीक्षेत NEET विना शिकवणी वर्ग अतिशय कठीण परिस्थितीत 720 गुणांपैकी 521 गुण प्राप्त करून दैदिप्यमान यश संपादन करणाऱ्या अल्पभूधारक शेतकरी मुलगा प्रेम कुबडे व त्यांचे आई वडिलांचा झाडगाव तालुका राळेगाव येथे घरीजाऊन तालुका शिवसेनाप्रमुख विनोद काकडे राळेगाव शहर प्रमुख राकेश राऊळकर यांच्या हस्ते मराठी इंग्रजी शब्दकोश वडील मधुकर नानाजी कुबडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तर या होतकरू विद्यार्थ्यांची आई उज्वला हिचा मीना शंकर गायधने माजी शिवसेना नगरसेविका नगरपंचायत राळेगाव यांच्या हस्ते साडी चोळी देऊन यथोचित गौरव करण्यात आला कार्यक्रमात उपस्थित महिलांकडून प्रेमचे औक्षण करण्यात आले तर याच कार्यक्रमात राष्ट्रसंत विचार प्रचारक हरी कुबडे शिवसेना कार्यकर्ते बंडू संगेवार यांनी प्रेमला ग्रामगीता ग्रंथ सप्रेम भेट दिला उपस्थित शिवसेना कार्यकर्ते आप्तस्वकीय गावातील नागरिक यांनी प्रेम ला उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या या सत्कार सोहळ्यात शिवसेना कार्यकर्ते शंकर गायधने नाना दरोडे गोपाल केवटे दीपक केवटे मंगेश लडी नारायण वडेकर श्रुतिका केवटे आरती रेंगे अंजली कुबडे शिवराज गायधने इत्यादी हजर होते
