
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, उमरखेड (ग्रामीण )
निंगनूर ते दगडथर रस्त्याचे कामाबदल मागच्या वृत्त पत्रामध्ये या रस्त्याची बातमी प्रसिद्ध केली होती.त्या वृत्त पत्रामध्ये असे निंगनूर व दगडथर परिसरामधील नागरिका कडुन असे सांगण्यात येत आहे काही महिन्या पूर्वी रस्त्याचे काम चालत चालता बंद झाले होते. तेव्हा माननीय संजय भाऊ राठोड याना निवेदन दिले असता त्यानी निवेदनचा दखल घेत निधी मंजुर करून काम सुरु करण्यात आले पण या निधीचा वापर बरोबर होत नाही असे निंगनूर व दगडथर परिसरातील नागरिकांकडून होत आहे.या रस्त्यावर बारीक चुरी गिट्टी चे कमी प्रमाणात वापरल्या जात आहे. व डांबर कमी प्रमाणात टाकल्या जात आहे, दबाई बरोबर होत नाही. अशी चर्चा निंगनूर व तसेच दगडथर गावामध्ये नागरिकांकडून होत आहे तरी शासनाचे दुर्लक्ष दिसत असल्यामुळे.ठेकेदारचा बोगस कामात जोरात सपाटा चालू असल्याचा दिसून येत आहे म्हणून शासनाने या रस्त्याचे कामाकडे लक्ष देण्याची गरज आहे नागरिकांकडून बोलल्या जात आहे. या बोगस रस्त्याचे कामा बद्दल नागरिक बोलत होते.तेव्हा उपस्थित, श्री भारत किसन जाधव, दिपक खंदारे, विलास राठोड (पत्रकार )अंकुश विक्रम राठोड हजर होते.
