ईसापुर धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदेश कोषाध्यक्ष चक्रधर पाटील देवसरकर यांचे निवेदन


प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी.


सध्या जून महिना लागून तो संपत येत असताना नैसर्गिक पाऊस पाण्याचा आणखीन कुठे थांग पत्ता नाही महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, असो की कोकण या भागात कुठेही पावसाचा थेंब पडला नाही त्यामुळे असे कधीच झालेले आढळले नाही. न भूतो न भविष्यती अशी परिस्थिती सध्या तरी निर्माण झालेली आहे जून महिना लागला असताना अक्षरशः ४० डिग्री सेल्सिअसच्या वरचे तापमान बघायला मिळत आहे त्यामुळे सजीवांचे प्रचंड पिण्याच्या पाण्यासाठी हाल होताना बघायला मिळत असून माणूस आपली तहान भागवण्यासाठी काहीतरी धडपड करून त्यावर उपाय शोधेल पण मुक्या जनावरांनी जावे तरी कुठे हा मोठा गहन किचकट प्रश्न बनला असून आता धरणातून पाणी सोडल्याशिवाय पर्याय नाही आणि काही ठिकाणच्या शेतकऱ्यांनी विहिरीत असलेल्या पाण्याच्या भरोशावर सरकी,हळद पिकाची सुद्धा लागवड केली पण आत्तापर्यंत नैसर्गिक पाऊसमान न झाल्यामुळे विहिरीचे पाणी जवळपास आठत आले आहे तेव्हा आता धरणाचे पाणी हेच वरदान ठरणार आहे त्याच अनुषंगाने उमरखेड, हदगाव, आणि हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्याच्या पिकांना जीवनदान मिळवण्यासाठी ईसापुर धरणातून पाणी सोडण्यात यावे व प्रशासनाने सहकार्य करावे यासाठी उपअभियंता उर्ध्व पेनगंगा प्रकल्प सिंचन उपविभाग क्रमांक २ उमरखेड व अधीक्षक अभियंता पाटबंधारे मंडळ नांदेड यांना राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदेश कोषाध्यक्ष चक्रधर पाटील यांनी २१जूनला निवेदन देऊन पाणी सोडण्याचे आवाहन केले आहे.