
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव येथील नवोदय क्रीडा मंडळाच्या खेळाडूंनी साई नगरी शिर्डी येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय टे. व्हॉलिबॉल स्पर्धत सहभाग घेतला होता त्याठिकाणी विविध जिल्ह्यातील १८ संघाने सहभाग घेतला होता , या स्पर्धेत यवतमाळ जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत राळेगाव येथील नवोदय क्रीडा मंडळाचे खेळाडू हिमांशू ठाकरे (न्यू इंग्लिश हायस्कूल राळेगाव), सोहेबखान पठाण (न्यू इंग्लिश हायस्कूल राळेगाव), अथर्व मालधुरे(स्कूल ऑफ ब्रिलियंट राळेगाव) , कृष्णा खेडेकर (स्कूल ऑफ ब्रिलियंट राळेगाव), यश वैद्य(स्कूल ऑफ ब्रिलियंट राळेगाव), चैतन्य नाकाडे (इंदिरा कनिष्ठ महाविद्यालय राळेगाव) या खेळाडूंनी यवतमाळ जिल्हा करिता तृतीय पारितोषिक पटकावले आहे. या स्पर्धेत यवतमाळ संघांनी हिंगोली , मुंबई उप., जळगाव , परभणी , मुंबई शहर या जिल्यातील संघाशी झूंज देत कास्य पदक ( तिसरे परितोषित) पटकाविले आहे . तसेच शिर्डी अहमदनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय टे. व्हॉलीबॉल स्पर्धेत अथर्व मालधूरे या खेळाडूंचे राष्ट्रीय स्पर्धे करीता निवड झाली असून, पुणे बालेवाडी येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत तो महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करेल .या संघाचे प्रशिक्षक प्रफुल खडसे , गणेश काळे, नरेश दुर्गे हे असून नवोदय मंडळाचे सदस्य …. यांचे सहकार्य लाभले आहे. या संघाला नवोदय क्रीडा मंडळाचे प्रमुख महेश भोयर व यवतमाळ जिल्ह्या टे. व्हॉलिबॉल असो. चे सचिव अभय धोबे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले तसेच नवोदय क्रीडा मंडळाचे खेळाडू मोनु खान, महेश राजकोल्हे, सचिन डोंगरे, सोनु खान, सूरज भगत, सूरज उजवने,अंकित क्षीरसागर, मयुरी चौधरी, आचल सावसाकडे यांचे सहकार्य लाभले आहे.
