
प्रतिनिधी::शेख रमजान
उमरखेड तालुक्यातील बिटरगांव (बु) यासह जेवली मोरचंडी देवरंगा या गावखेड्यासह परिसरात मागील अनेक दिवसापासुन दडी मारून बसलेल्या मान्सूनच्या पावसाची नागरिकासह शेतकरी आतुरतेने वाट बघत होते. मृग नक्षत्र कोरडे गेल्या नंतर शेतकऱ्यांना पावसाची मोठया आतुरतेने प्रतीक्षा होती.
पावसाअभावी अनेक शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन या पिकाची लागवड व पेरणी खोळंबलेली होती.जुन महिना संपत आला तरी पावसाचे आगमन न झाल्याने शेतकरीवर्ग हवालदील झाला होता. परिसरातील शेतकरायांना मोठ्या कष्टाने ऊसनवारी पैसे घेऊन बि, बियाने, खंताची खरेदी करून शेतजमीनीची मशागत करून पावसाची आगमनाची वाट बघत होते.तरीपन अल्प प्रमाणात बरसलेल्या पावसाने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.या पावसाने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असुन या पावसामुळे शेतशिवारात कापुस सोयाबीन पिकाची लागवड व पेरणीला वेग येणार एवढे नक्की
