
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील एकाच आठवड्यात तिन शेतकऱ्यांचे जिव गेले यात राळेगाव तालुक्यातील तेजनी येथील शेतकरी पुत्र भुपेश गुलाब पालकर यांनी विहीरित आत्महत्या केली तर टाकळी येथील शेतकरी विठ्ठल कुळसंगे हे शेतात काम करत असताना त्यांचा शेतातील उभ्या असलेल्या पोलच्या अर्थींगचा करंट लागून जागीच मृत्यू झाला विशेष म्हणजे मृतक विठ्ठल कुळसंगे यांनी चार दिवसा अगोदर वायरमनला तोंडी स्वरूपात सांगितले होते माझ्या शेतात पोलला करंट येत आहे म्हणून वायरमनने लक्ष दिले असते तर म्रुतक विठ्ठल कुळसंगे यांचा जिव वाचला असता असे गावकरी सांगत होते. तर सावनेर येथील स्वप्नील विनायक आत्राम हे शेतातून घरी आले असता बाथरूम मध्ये गेले असता लोखंडी दरवाजा याला करंट असल्याने स्वप्नील ने दरवाज्याला हात लावताच त्याचा सुद्धा जागीच मृत्यू झाला. मृतक कुटुंबाची राळेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, माजी जिल्हा परिषद सदस्य भाजपा तालुका अध्यक्ष चित्तरंजन दादा कोल्हे, उपाध्यक्ष संदिप तेलंगे, दिनेश गोहने यांनी भेट दिली व कुटुंबाच्या समस्या ऐकुन घेतल्या.
