
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
शहरातील हरे कृष्ण मंगल कार्यालयासमोर आज साडेचार च्या सुमारास टाटा एस क्रमांक एम.एच. 12 जी.टी 4890 हे वाहन नामदेवराव झाडे एकबुरुजी वरून राळेगाव शहरात येत असताना विरुद्ध दिशेने येत असलेली फॅशन प्रो क्रमांक 29 बी ए 5452 चालक खुशाल सोनतापे वय वर्षे 40 राहणार रावेरी यांचे समोरासमोर जबर धडक झाल्याने मोटरसायकल स्वार हा टाटा याच्या समोरील भागात धडकल्या असल्याने मोटर सायकल स्वारास जबर इजा झाली असल्याने त्याला ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे पोहोचविण्यात आले व तिथून यवतमाळ येथे रवाना करण्यात आले असून टाटा एस मधील चालक नामदेव झाडे व सोबत असलेल्या लहान मुलगा यांना सुद्धा इजा झालेली आहे, त्यांचा उपचार राळेगाव ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे करण्यात आला आहे,पुढील तपास राळेगाव पोलीस स्टेशन करीत आहे.
