उमेद महाराष्ट्र राज्य महिलाकल्यांणकारी कॅडर संघटना यांचे आमदार अशोक उईके यांना निवेदन

  

राळेगाव तालुक्यातील उमेद महाराष्ट्र राज्य महिला कल्याणकारी कॅडर संघटना शाखा राळेगाव कार्यकारिणी मंडळ यांची दिनांक १ जुलै २०२३ ला ठीक १० वाजता बैठक घेण्यात आली होती सदर या बैठकिचे खालील प्रमाणे विषय उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष कॅडर अंतर्गत राळेगाव तालुक्यातील कल्याणकारी कॅडर संघटना या राळेगाव तालुक्यातील सर्व गावपातळीवरील कार्यरत,असलेल्य कॅडर यांचे मानधनात वाढ करण्यात यावे, सर्व कॅडर चे मानधन हे दर महिण्यात नियमित पणे मिळण्यात यावे, सदर या दोन मुद्यावर राळेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार अशोक उईके यांच्या सोबत सविस्तार चर्चा करून निवेदन देण्यात आले व इतर काही विषयावरील संघटण कार्यकारिणी मंडळ. यांनी आपली बाजु माडनी केली असताना आमदार उईके यांनी आपल्या आत्मविश्वासाने असे सांगितले आहे की,वरील प्रमाणे दोन मागण्यां मी मा.गिरीश माहजन,ग्रामविकास मंत्री,यांच्या सोबत आपली मुबंई येते बैठक लावून आपल्या मागण्यां पुर्ण *करू व त्याच प्रमाणें येणाऱ्या पावसाळी अधिवेशन मध्यें आपल्या मागण्यां माडु असे निवेदन देतेवेळी महिलांना आमदार अशोक उईके यांनी आश्वासन दिले व
सर्व महिलानी आपले मतभेद बाजूला ठेवून संघटणे मध्यें सहभागी व्हावे, आणि सहकार्य करावे असे मत तालुका कॅडर कार्यकारणी संघटनेच्या (अध्यक्ष) सौ. गीता श्रीकांत पढाल, यांनी व्यक्त केले आहे. निवेदन देतेवेळी संघटनेचे मार्गदर्शक गजानन आत्राम, (उपाध्यक्ष) मंगेश पुडके, (सचिव) सौ. ज्योती गोपीचंद ढाले, (सहसचिव) सीमा पंधरे, (कोषाध्यक्ष) सपना भगवान तागडे, संपर्कप्रमुख काशिनाथ मारुती भगत, प्रफुल पटेलपैक, प्रसिद्धी प्रमुख श्यामलाल एडसकर, संघटक शिला जंगींंलवार, सुनंदा पुडके, शितल नरडवार, अरुणा जोगी, प्रज्ञा पूडके, माया पाझारे, प्रगती कावळे, जोशना किन्नाके,योशोधर लोहवे, शितल करताळे, वर्षा फुलमाळी, सुनिता गावंडे, वर्षा मोघे, लीना नाटक व संघटनेचे सल्लागार कविशर लढी, जीवन कुंमरे, सुभाष वाटगुळे, प्रफुल मरसकोल्हे, ज्योती शामलाल एडसकर, जोशना गेडाम उपस्थित होत्या.