कचरा संकलन करणारी ढाणकी शहरातील यंत्रणा ढेपाळलेली नगरपंचायत प्रशासनाची भूमिका तथास्तुची का?


प्रतिनिधी:: प्रवीण जोशी
यवतमाळ


कोणतीही शहर स्वच्छतेतून समृद्धीकडे जात असते घराची कळा ज्याप्रमाणे अंगण दर्शविते शहराची प्रगती ही शहर स्वच्छता राबविणारी यंत्रणायावरच अवलंबून असते व शहराची आणि संबंधित प्रशासनाची सुद्धा प्रगती किंवा अधोगतीचा आलेख यावरून कळतो एकेकाळी स्वच्छता राबविणाऱ्या मोटर गाड्यांचा विशिष्ट असा ध्वनी लहरीचा आवाज कानावर पडत होता व तो प्रवर्तित होत होता तो मात्र आता बंद झाला असून विज्ञानाचा व तंत्रज्ञानाचा उपयोग करून चालणारी ही ध्वनी यंत्रणा मृतप्राय झाली असून अनेकांनी याबाबत विचारणा केली असता नेहमीचे ठरल्याप्रमाणे उत्तर बघू करतो पाहू असेच उत्तर सर्वसामान्यांना मिळत आहे अधिक विचारणा केली असता काही दिवस ही यंत्रणा व्यवस्थितपणे चालून पुन्हा जैसे थे अशीच अवस्था बनते निसर्गाच्या बदलत्या वातावरणामुळे या यंत्राला सुद्धा संसर्गजन्य सर्दी खोकला आजार झाला का हा प्रश्न इथे उपस्थित होतो एखाद्या प्रभागांमध्ये अरुंद जागा असेल आणि ही कचरा संकलन करणारी गाडी त्या ठिकाणी पोहोचत असताना एखादया नालीवरील पूल असल्यास तो ओलांडून जात असताना एखादा चढ असल्यास गाड्या बरोबर चढत सुद्धा नाहीत अशी न भूतो न भविष्यती अशी कुचकामी यंत्रणा शहरवासीयांच्या माथी घातलेली दिसते.