नवनियुक्त ठाणेदार सुजाता बनसोड यांनी बोलावली पत्रकाराची बैठक


लोकहित महाराष्ट्र उमरखेड तालुका प्रतिनिधी: संदीप बी. जाधव


आज रोजी ढाणकी पोलीस स्टेशनमध्ये सर्व खेड्यापाड्यातील पत्रकारांना एकत्रित करून ठाणेदार सुजाता बनसोड मॅडम यांनी कायदा व पत्रकारिता सर्व पत्रकारांना पटवून दिले, स्पष्ट व्यक्तिमत्व मांडताना सुजाता मॅडम यांनी जातीवादावर ( हिंदू मुस्लिम) कुठल्याही धर्मा बद्दल हस्तक्षेप जातिवाद होईल अशी बातमी लावू नये असे बजावून सांगितले व गरीब जनता यांना न्याय मिळवून द्या कुठलीही अवैद्य बातमी आम्हाला कळवल्याशिवाय लावू नका अन्यथा कारवाई करण्यात येईल, पत्रकार आणि पोलीस यामध्ये कुठल्याही मतभेद न ठेवता एकत्र मिळून कार्य करू असं सांगितले. कार्य सरळ साधे सोपे कोणाचेही मन न दुखवता सामाजिक कार्य करणाऱ्या सुजाता बनसोड मॅडम आहेत. सर्व पत्रकार बांधवांना कळविण्यात येते कोणालाही समाजात वावरत असताना काही अडचण पडली की आम्ही सर्व पोलीस तुम्हाला मदत करू जर चांगले कार्य असेल तर वाईट कारणासाठी कोणीही फोन जरी केलात त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू चांगल्याला चांगलं तेवढेच वाईट ला वाईट असे रोखठोक विचार मांडले . उपस्थित पोलीस कर्मचारी, मस्के साहेब, खरात साहेब, चाटे साहेब व सर्व ढानकी शहरातील पत्रकार वर्ग बैठकीस उपस्थित होते.