
सहसंपादक : रामभाऊ भोयर
संपूर्ण आयुष्य आपले आई-वडील आपल्यासाठी खर्ची घालतात त्यांचे ऋण फेडणे शक्य नाही मात्र वडिलांच्या अंतिम प्रवासात त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी देऊन अंतिम संस्कार करावा अशी इच्छा मुलींच्या मनात आली आणि कुटुंबीयांनी रूढी परंपरेला फाटा देत संमतीही दर्शवली.
राळेगाव तालुक्यातील खैरी येथील हरिदास गणपत बोढे यांचे २४ ऑगस्ट २०२४ रोज शनिवारला हिंगणघाट येथील ग्रामीण रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या मागे त्यांची पत्नी तीन मुली जावई नातवंड असा परिवार आहे.
संपूर्ण वडिलांनी आपले आयुष्य आपल्यासाठी खर्ची घातले आपण जसे म्हटले त्या पद्धतीने त्यांनी आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण केल्या त्यामुळे त्यांचे ऋण आपण फेडू शकत नाही मात्र त्यांच्या अंतिम प्रवासात त्यांच्या पार्थिवाला मुखांग्नी देऊन अंत्यसंस्कार करावा अशी इच्छा निकिता डोंगे, पूजा खंडाळकर, निशा कळसकर या मुलींच्या मनात आली यावर तिच्या कुटुंबीयांनी रूढी परंपरेला फाटा देत याला संमती दर्शविली मृतक हरिदास गणपत बोढे हे खैरी येथील रहिवासी आहे त्यांना मुले नसून निकिता डोंगे पूजा खंडाळकर निशा कळसकर अशा तीन मुली आहेत मात्र त्यांचे वडील हरिदास यांना कॅन्सर हा उत्तम आजार असल्याने त्यांना हिंगणघाट येथे ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्यांची प्रकृती ठीक झाली नसल्याने त्यांचा हिंगणघाट येथे रुग्णालयातच मृत्यू झाला हिंदू धर्माच्या चालीरीतीप्रमाणे महिलांना अंत्यसंस्कार करण्याच्या विधीत सक्रिय स्थान दिले जात नाही मात्र आपल्या वडिलांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी निकिता डोंगे पूजा खंडाळकर निशा कळसकर यांनी कुटुंबियाकडे मागणी केली व त्यांनी वडीलाची अंत्ययात्रा मोक्षधाम नेत असताना निकिता डोंगे हिने आखट धरून वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करीत चितेला मुखांनी दिली त्यामुळे महिलांनाही अंत्यसंस्कार करतेवेळी अंत्यविधी पार पाडण्याची संधी मिळाल्याने समाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण झाला आहे जेवढा हक्क मुलांचा आहे तेवढाच मुलींचा सुद्धा आहे हे आपल्या कृतीतून त्यांनी सिद्ध करून दाखविले आहे.
