स्माईल फाउंडेशनच्या वतीने न.प. शाळा क्र.7 मध्ये वृक्षारोपण

वणी :- नितेश ताजणे

स्माईल फाउंडेशनच्या वतीने येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्र. 7 मध्ये वृक्षारोपण करण्यात आले.या प्रसंगी नगर परिषदेचे प्रशासन अधिकारी गिरीधर चवरे, येथील वार्ताहर व न्युज मिडिया पत्रकार असोसिएशन चे सचिव परशुराम पोटे, पत्रकार जितेंद्र कोठारी, इंदू सिंग, स्माईल फाउंडेशन चे अध्यक्ष सागर जाधव व शाळा क्र. 7 चे मुख्याध्यापक गजानन कासावार उपस्थित होते.
पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी स्माईल फाउंडेशन च्या वतीने वणी शहरात आवश्यकतेनुसार निरनिराळ्या भागात वृक्षारोपण करणे सुरू आहे. या संस्थेच्या वतीने या वर्षी 500 पेक्षा अधिक वृक्षांचे रोपन करण्यात आले आहे.

या प्रसंगी शाळा क्र. 7 मधील खो-खो व कबड्डी च्या मैदानावर वड, कडुलिंब, चिंच व फळझाडे उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते लावण्यात आली.
या प्रसंगी शाळेतील विद्यार्थी व कल्पना मुंजेकर, चंदू परेकर, शुभांगी वैद्य, मंगला पेंदोर, विजय चव्हाण, दिगंबर ठाकरे हे शिक्षक वृंद तसेच स्माईल फाउंडेशन चे सचिव आदर्श दाढे, उत्कर्ष धांडे, तन्मय कापसे,अनिकेत वासरीकर, मयूर भरटकर हे सदस्य उपस्थित होते.