ED कार्यवाही भीतीपोटी राज्यकर्ते विकल्या जात आहे:- माजी मंत्री पूरके, केंद्र सरकार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात असमर्थ

सहसंपादक : रामभाऊ भोयर

ED कार्यवाही केली जाईल या भीतीपोटी राज्यकर्ते विकल्या जात असल्याचे वक्तव्य माजी मंत्री प्रा.वसंत पुरके यांनी शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्राम गृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले व सोबतच केंद्र सरकारच्या नवीन योजना येत आहे त्या फक्त नावं बदलून येत आहे या सर्व योजना काँग्रेस सरकारच्या होत्या व मोदी सरकारने ज्या नविन योजना सुरु केल्या त्या सर्व सामान्य जनतेच्या मानगुटीवर बसलेल्या आहे उदाहरणात नोट बंदी मुळे अनेक लोकांना प्राण गमवावे लागले असेही माजी मंत्री पुरके यांनी सांगितले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कधीही मीडियाच्या समोर येताना दिसत नाही व कोणत्याही प्रश्नाला उत्तर देताना दिसत नाही मोदी सरकारला ९ वर्ष पूर्ण झाले परंतु विकास मात्र फक्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांनी केला बाकी प्रश्न तसेच शिल्लक आहे त्यामुळे मोदी सरकारला नऊ वर्ष पुर्ण झाले परंतु त्यांनी कोणतेही काम केले नाही असे ९०० प्रश्न माझ्याकडे आहे त्याचे उत्तर त्यांनी द्यावे असे पत्रकार परिषदेत माजी मंत्री पुरके हे बोलले. वीस हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचारावर मोदी सरकार प्रेस घेऊन बोलत का नाही असाही वाक्य पत्रकार परिषदेत पुरके यांनी उचारले अनेक अशा समस्या आहे की त्या आजही शिल्लक आहे त्यात युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला नाही महागाई वाढली शेतकऱ्यांचा प्रश्नांकडे दुर्लक्ष केले कापसाचे दर कमी केले अशा अनेक समस्या असताना नवीन कायदा तयार करण्यात येत तो म्हणजे समान नागरी कायदा तो कायदा लागू करण्याच्या आदी त्या कायद्याच्या बाबी व मसुदा जनते समोर ठेवला गेला पाहिजे असेही माजी मंत्री पुरके यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. अनेक भ्रष्ट नेते हे तुरुंगात जाण्यापेक्षा भाजपात प्रवेश करत आहे व एकदा भाजपात भ्रष्ट नेता गेला की तो स्वच्छ होत आहे ही एक भाजपा कडून सुरू असलेली हुकमशाही आहे अशीही माहिती दिली. सभागृहात वीस हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचारावर प्रश्न विचारला म्हणून राहुल गांधी यांचे सदस्य पद रद्द करण्यात आले आहे असंही पत्रकार परिषदेत सांगितले गेले आहे. महीला खेळाडू यांच्यावर अन्याय झाला त्यांनी आंदोलन केले परंतु यावरही एकदाही प्रंतप्रधान बोलू शकत नाही ही तर लोकशाहीची हत्या असल्याचे माजी मंत्री पूरके यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या ९ वर्षात कोणतेही काम चांगले झाले नाही त्यामुळे सर्व सामान जनता आता भाजपाला कंटाळली आहे त्यामुळे कर्नाटकात भाजपाला पराभव पत्करावा लागला अशीही माहिती माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.